Homeताज्या बातम्यागणेश पेठेतील सार्वजनिक स्वच्छतागृहाची दुरवस्था; नागरिक त्रस्त, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

गणेश पेठेतील सार्वजनिक स्वच्छतागृहाची दुरवस्था; नागरिक त्रस्त, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

पुणे : शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या 443, गणेश पेठ – नवीन दूध भट्टी परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. स्वच्छतागृहात मोठ्या प्रमाणात घाण साचलेली असून अनेक दिवसांपासून साफसफाई न झाल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याशिवाय या ठिकाणी पाण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या स्वच्छतागृहाबाबत पुणे महानगरपालिकेकडे अनेक वेळा तक्रारी देण्यात आल्या आहेत, मात्र त्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या स्वच्छतागृहाचा वापर दररोज मोठ्या संख्येने नागरिक करतात. विशेषतः जेष्ठ नागरिक, महिला व स्थानिक रहिवासी यांना या अस्वच्छ परिस्थितीमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. स्वच्छतागृहातील अस्वच्छता आणि पाण्याचा अभाव यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या संदर्भात राष्ट्रीय दलित पॅंथर सेना, पुणे शहर युवक अध्यक्ष सोहम भाऊ नवले यांच्याकडेही नागरिकांनी लेखी तक्रार दिली आहे. नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन स्वच्छतागृहाची साफसफाई, पाणीपुरवठा व नियमित देखभाल व्यवस्था सुरू करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, शहर स्वच्छतेबाबत मोठमोठे दावे करणाऱ्या महानगरपालिकेने प्रत्यक्षात अशा मूलभूत सुविधांकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे, अन्यथा आंदोलनाचा इशाराही स्थानिकांकडून देण्यात येत आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

​पुण्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; पोलीस संचलन मैदानात दिमाखदार संचलन आणि गौरव सोहळा

​पुणे: महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सोमवार, दि. १ मे २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजता शिवाजीनगर येथील...

महाराष्ट्रात आजपासून मतमोजणी सुरू होत असताना नागरिकांना उत्तर देण्यासाठी 33 प्रश्न | पुणे बातम्या

डॉ निरुपमा जे डांगे | भारत सरकारचे सहसचिव आणि महाराष्ट्राचे मुख्य प्रधान जनगणना अधिकारी" decoding="async" fetchpriority="high"/>डॉ निरुपमा ज डांगे | भारत सरकारचे सहसचिव...

ISC, ICSE टॉप स्कोअरर्स प्लॅनिंगवर अवलंबून असतात, चिकाटी देतात. पुणे बातम्या

यावर्षी ICSE परीक्षेत महाराष्ट्रातील मुलांनी मुलींच्या 99.93% उत्तीर्णतेशी बरोबरी केली, ही एक महत्त्वपूर्ण बदल आहे. मुलींनी ISC निकालांमध्ये आपली आघाडी कायम ठेवली असताना,...

MSRTC कँटीन 1 जूनपासून चहा, नाश्ता 40 रुपये दराने विकणार: सरनाईक | पुणे बातम्या

पुणे: अखिल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कॅन्टीनमध्ये 1 जून 2026 पासून चहा आणि नाश्ता 40 रुपये दराने विकला जाईल, अशी घोषणा राज्याचे...

यापुढे पवार कुटुंबातील कोणत्याही सदस्याविरुद्ध निवडणूक लढवणार नाही, असे सुप्रिया म्हणाल्या. पुणे बातम्या

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (सप) कार्याध्यक्षा आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी जाहीर केले की, पवार कुटुंबातील कोणत्याही सदस्याविरुद्ध मी...

error: Content is protected !!