Homeताज्या बातम्याधर्मसंवर्धन ते महिला सशक्तीकरणाचा अद्वितीय वारसा... त्रिशताब्दी वर्षांनंतरही अजरामर प्रेरणा — पुण्यश्लोक...

धर्मसंवर्धन ते महिला सशक्तीकरणाचा अद्वितीय वारसा… त्रिशताब्दी वर्षांनंतरही अजरामर प्रेरणा — पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर!

धर्मसंवर्धन ते महिला सशक्तीकरणाचा अद्वितीय वारसा…
त्रिशताब्दी वर्षांनंतरही अजरामर प्रेरणा — पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीक्षेत्र चौंडी, अहिल्यानगर येथे आज ‘पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सव’ कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती दर्शवली. धर्मसंवर्धन, न्यायप्रिय राज्यकारभार आणि महिला सशक्तीकरणाचा अमिट वारसा जपणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आज त्यांच्या जन्मभूमी श्रीक्षेत्र चौंडी (अहिल्यानगर) येथे आयोजित भव्य कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
या विशेष प्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करत उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी सांगितले की, त्रिशताब्दी वर्षांनंतरही अहिल्यादेवींचे जीवन हे शासन, संस्कृती आणि समाजासाठी प्रेरणादायी दीपस्तंभ आहे.
परकीय आक्रमणांच्या काळात भारतीय संस्कृतीवर झालेल्या आघातांना त्यांनी न डगमगता उत्तर दिले. काशीचे घाट, सोमनाथ मंदिरासह अनेक तीर्थस्थळांचे त्यांनी आपल्या वैयक्तिक संपत्तीचा उपयोग करून जीर्णोद्धार केले. हे कार्य केवळ धार्मिक नव्हते, तर भारताच्या सांस्कृतिक अस्मितेचे पुनरुज्जीवन करणारे होते.
त्यांचा राज्यकारभार हा दूरदृष्टी, न्यायनिष्ठा आणि सामाजिक समरसतेचा उत्तम आदर्श होता. त्यांनी प्रजेसाठी पारदर्शक आणि न्यायपूर्ण प्रशासन उभारले. हुंडाबंदी, सशक्त न्यायव्यवस्था, समाजाभिमुख योजना आणि महिलांना केंद्रस्थानी ठेवणारी धोरणे यांमुळे त्यांचे नेतृत्व सर्वकालीन प्रेरणा बनले आहे.
विशेषतः महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी उभारलेले उपक्रम काळाच्या पुढचे होते – माहेश्वरी वस्त्रनिर्मिती, महिलांची सैनिकी तुकडी, सामाजिक न्यायासाठीचे कायदे यामधून त्यांनी महिलांना आत्मनिर्भरतेचा आणि स्वाभिमानाचा मार्ग दाखवला.
राज्य शासनाकडून या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त चौंडी येथील सर्वांगीण विकासासाठी ₹681 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मितीच्या माध्यमातून त्यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची महत्त्वाकांक्षा शासनाने व्यक्त केली आहे.
या कार्यक्रमासाठी मा. राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्य शासनातर्फे निमंत्रण देण्यात आले होते. काही कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र लवकरच ते श्रीक्षेत्र चौंडी येथे येऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला आदरांजली अर्पण करतील, असा विश्वास मा. मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य हे केवळ इतिहास नव्हे, तर सुशासनासाठी मार्गदर्शक आहे. त्यांच्या विचारांमधून आणि कृतीतून भारतात सामाजिक समतेचा, न्यायप्रियतेचा आणि संस्कृतीच्या संवर्धनाचा आदर्श सतत जागृत राहणार आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री अतुल सावे, मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार, लोकप्रतिनिधी व इतर मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ISC, ICSE टॉप स्कोअरर्स प्लॅनिंगवर अवलंबून असतात, चिकाटी देतात. पुणे बातम्या

यावर्षी ICSE परीक्षेत महाराष्ट्रातील मुलांनी मुलींच्या 99.93% उत्तीर्णतेशी बरोबरी केली, ही एक महत्त्वपूर्ण बदल आहे. मुलींनी ISC निकालांमध्ये आपली आघाडी कायम ठेवली असताना,...

MSRTC कँटीन 1 जूनपासून चहा, नाश्ता 40 रुपये दराने विकणार: सरनाईक | पुणे बातम्या

पुणे: अखिल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कॅन्टीनमध्ये 1 जून 2026 पासून चहा आणि नाश्ता 40 रुपये दराने विकला जाईल, अशी घोषणा राज्याचे...

यापुढे पवार कुटुंबातील कोणत्याही सदस्याविरुद्ध निवडणूक लढवणार नाही, असे सुप्रिया म्हणाल्या. पुणे बातम्या

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (सप) कार्याध्यक्षा आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी जाहीर केले की, पवार कुटुंबातील कोणत्याही सदस्याविरुद्ध मी...

देहू रोड येथील पीडितेवर नऊ गोळ्या झाडल्या, असे पोलिसांनी सांगितले. पुणे बातम्या

पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांनी सांगितले की, रमेश रेड्डी (वय 35) या माजी जुगार अड्डा चालकावर मंगळवारी सायंकाळी नऊ गोळ्या झाडण्यात आल्या. पीडित आणि...

सोडलेल्या टाकीतून विषारी वायूची गळती 26 रूग्णालयात, सर्व स्थिर | पुणे बातम्या

पुणे: गंगाधाम चौकाजवळील आई माता मंदिराजवळील मोकळ्या भूखंडावर गुरुवारी पहाटे 12.30 च्या सुमारास पॉली ॲल्युमिनियम क्लोराईड वायूची गळती न झालेल्या टाकीतून झाल्याने...

error: Content is protected !!