Homeताज्या बातम्यापाचगाव-पर्वती टेकडी वाचवण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन; भूमाफियांवर मोक्का कारवाईची मागणी

पाचगाव-पर्वती टेकडी वाचवण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन; भूमाफियांवर मोक्का कारवाईची मागणी

पुणे: भ्रष्टाचार मुक्त प्रशासन – माहिती अधिकार कार्यकर्ता एकता परिषदेच्या वतीने पुण्याचे पर्यावरण व पाचगाव-पर्वती टेकडी वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर दिनांक १८/०५/२०२५ रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून बेमुदत धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे. परिषदेचे मुख्य समन्वयक किशोर मनोहर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून समन्वयक सागर ढावरे, संजय साळवी, आकाश नागटिळे, सागर कांबळे, पीर साहेब गायकवाड, धारा जोशी तसेच मुंबई हायकोर्टाचे विधी सल्लागार अॅड. आकाश साबळे व अॅड. संघर्ष आपटे हे या आंदोलनाचे पाठबळ देत आहेत.
आंदोलनाच्या प्रमुख मागण्या
१. मोक्का अंतर्गत कठोर कारवाई
सर्व्हे नं. २३/१क, आनंद विहार येथील पाचगाव-पर्वती टेकडी फोडून बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन करणाऱ्या श्रीमती मीना अरुण आपटे, श्री. प्रकाश अरुण आपटे, श्रीमती गौरी विकास आपटे, श्रीमती सुचिता प्रदीप पावगी, श्री. आर्यन विकास आपटे, श्री. भरत मोहनलाल सोळंकी, श्री. जयेश मोहनलाल सोळंकी, श्री. संजय उत्तमराव काळभोर, संतोष विठ्ठल कोठावळे व सुरेखा संतोष कोठावळे या भूमाफियांवर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
२. शासकीय दंड वसुली अथवा जमीन जप्ती
पाचगाव-तळजाई टेकडी, सर्व्हे नं. २३/१क, मौजे हिंगणे खुर्द, ता. हवेली, जि. पुणे येथील गौण खनिज उत्खनन प्रकरणातील शासनाचा दंड तात्काळ वसूल करण्यात यावा, अन्यथा सातबारावरील सर्व क्षेत्राची जमीन शासन दप्तरी जमा करण्यात यावी.
३. आरोपींना तात्काळ अटक
बेकायदेशीर उत्खनन तात्काळ बंद करून संबंधित जागा मालक व आरोपी — श्रीमती मीना अरुण आपटे, श्री. प्रकाश अरुण आपटे, श्रीमती गौरी विकास आपटे, श्रीमती सुचिता प्रदीप पावगी, श्री. आर्यन विकास आपटे, श्री. भरत मोहनलाल सोळंकी, श्री. जयेश मोहनलाल सोळंकी, श्री. संजय उत्तमराव काळभोर, संतोष विठ्ठल कोठावळे व सुरेखा संतोष कोठावळे यांना तात्काळ अटक करण्यात यावी.
४. बीडीपी झोनमधील फसवणूक थांबवावी
बीडीपी झोनमधील अनधिकृत प्लॉटिंग व विक्री व्यवहार बंद करून नागरिकांची फसवणूक थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे.
५. SIT व CID मार्फत उच्चस्तरीय चौकशी
सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे वरील आरोपींविरुद्ध — श्रीमती मीना अरुण आपटे, श्री. प्रकाश अरुण आपटे, श्रीमती गौरी विकास आपटे, श्रीमती सुचिता प्रदीप पावगी, श्री. आर्यन विकास आपटे, श्री. भरत मोहनलाल सोळंकी, श्री. जयवंत जयेश मोहनलाल सोळंकी, श्री. संजय उत्तमराव काळभोर, संतोष विठ्ठल कोठावळे व सुरेखा संतोष कोठावळे या भूमाफिया सिंडिकेटचा पर्दाफाश करून SIT व CID मार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, असे आंदोलकांनी बजावले आहे. गुन्हे दाखल असूनही कारवाई होत नाही याची चौकशी करण्याचीही मागणी आहे.
६. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई
सर्व्हे नं. २३/१क, मौजे हिंगणे, ता. हवेली, जि. पुणे येथील बेकायदेशीर कामांना संरक्षण देणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
७. सार्वजनिक अहवाल जाहीर करावा
सर्व्हे नंबर २३/१ क, मौजे, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील जमिनीवर ETS संयुक्त सातबारावरील सर्व क्षेत्राची मोजणी करून प्रत्यक्ष किती उत्खनन झाले याचा सार्वजनिक अहवाल जाहीर करण्यात यावा.
८. पर्यावरण रक्षणासाठी दंडात्मक कारवाई
पर्यावरण नष्ट करणाऱ्यांविरुद्ध कठोर दंडात्मक कारवाई करून शासन महसूल वाचवण्यात यावा.
गंभीर प्रकरणे
प्रकरण १ – राऊत आयकॉन्स प्रकल्प (सर्व्हे नं. १३०/१/१, सिंहगड रोड, पुणे-३०)
मा. तहसीलदार यांनी विविध तारखांना तुकड्या-तुकड्यांमध्ये परवानग्या देत एकूण १०५० ब्रास उत्खननास परवानगी दिली. मात्र Maharashtra Land Revenue Code, १९६६ नुसार तहसीलदारांना केवळ ५०० ब्रासपर्यंतच अधिकार आहे. मंडल अधिकाऱ्यांच्या पंचनाम्यानुसार १२०९.६६ ब्रास उत्खनन झाल्याचे नमूद असून प्रत्यक्ष उत्खनन यापेक्षाही अधिक असल्याची शक्यता आहे. यावरून नियमभंग व संगनमताचा गंभीर संशय निर्माण होतो.
प्रकरण २ – सिटी सर्व्हे नं. २०७३, विजयनगर, सदाशिव पेठ, पुणे
संबंधित विकासकांकडून परवानगीपूर्वीच मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर उत्खनन करून बांधकाम सुरू करण्यात आले. माहिती अधिकार अर्जानंतर संशयास्पद पद्धतीने परवानगी घेण्यात आली. त्यामुळे ETS/Joint Measurement करून प्रत्यक्ष उत्खनन निश्चित करणे अत्यावश्यक असल्याचे आंदोलकांनी नमूद केले.
प्रकरण ३ – सर्व्हे नं. १२० अ व १२० ब (राहुल हिरवे प्रकरण)
या प्रकरणात रू. ३२,७०,०७५/- दंड आकारण्यात आला असूनही शासनाकडे वसुली झालेली नाही. बेकायदेशीर ब्लास्टिंग करण्यात आले असून गृह विभागाची परवानगी नाही, पोलीस आयुक्त कार्यालयाची NOC नाही तसेच पोलीस स्टेशनची कोणतीही परवानगी नाही. तरीही गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ होत असल्याने भ्रष्टाचाराचा गंभीर संशय निर्माण होतो, असे आंदोलकांनी सांगितले.
प्रकरण ४ – तहसीलदार श्रीमती स्मिता माने यांचे अयोग्य वर्तन
तहसीलदार श्रीमती स्मिता माने यांनी नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले, नागरिकांशी अपमानास्पद वर्तन केले तसेच “तुम्हाला जे करायचे ते करा” अशा प्रकारची वक्तव्ये केली. हे वर्तन लोकसेवकाच्या कर्तव्याला व संविधानिक मूल्यांना धरून नसल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.
आंदोलकांचे निर्धाराचे सूर
“पुणेकर जनतेच्या हक्कासाठी लढणार! भूमाफियांपुढे झुकणार नाही! पाचगाव-पर्वती टेकडी वाचवा – पुण्याचे फुफ्फुसे वाचवा!”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राजा दिनकर केळकर संग्रहालय आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त पॉडकास्ट, कलाकृती आणि इतिहासासह

राजा दिनकर केळकर संग्रहालयात बसवण्यात आलेल्या सोलर पॉवर सिस्टीमचे उद्घाटन सोमवारी होणार आहे. पुणे : राजा दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय सोमवारी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन...

सोपानबाग सोसायटीसाठी प्रवेश रस्ता एक सापळा

पुणे: सोपानबाग येथील ताराबाग परिसरातील अनिका एसेन्शिया सोसायटीतील सुमारे ३०० रहिवाशांना वर्षातील बहुतांश काळ त्यांच्याच घरात अडकल्याचे जाणवते. संपूर्ण पावसाळ्यात अनेक आठवडे, किंवा जेव्हा...

8 व्या CPC पॅनेलने अपंगत्व पेन्शन कराच्या रांगेत जखमी सैनिकांची भेट घेतली

अध्यक्ष न्यायमूर्ती (निवृत्त) रंजना प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वाखाली 8व्या केंद्रीय वेतन आयोग समितीच्या शिष्टमंडळाने एनडीएला भेट दिली. पुणे : न्यायमूर्ती (निवृत्त) रंजना प्रकाश...

मुलगा न झाल्याने पुण्यातील व्यक्तीने पत्नीच्या प्रायव्हेट पार्टवर ॲसिड टाकले, गुन्हा दाखल

पुणे - मुलगा झाला नसल्यामुळे तिच्यावर टॉयलेट क्लिनिंग ॲसिड टाकून पत्नीला मारहाण करून तिच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर दुखापत केल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी...

आदिवासी महिला धाडसी डोंगराच्या पायथ्याशी पाण्यात चालत पडण्याचा धोका पत्करतात

पुणे : पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर, पावसाळ्यात सरासरी 1,900 ते 2,000 मि.मी.पेक्षा जास्त पाऊस पडतो, त्यामुळे पाणीटंचाईची तक्रार करायला हरकत नाही. पण इथला...

error: Content is protected !!