Homeताज्या बातम्यामसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा हडपसर मध्ये छापा; ५ तरुणींची...

मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा हडपसर मध्ये छापा; ५ तरुणींची सुटका

पुणे: हडपसर परिसरातील एका मसाज सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पुणे पोलीस गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. ‘एस.पी. बॉडी फिटनेस’ या मसाज सेंटरवर टाकलेल्या छाप्यात ५ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, ५५ वर्षीय महिला चालकाला अटक करण्यात आली आहे.
​नेमकी घटना काय?
​हडपसर गाडीतळ येथील वैभव थिएटर शेजारी असलेल्या ‘भोसले आर्केड’ इमारतीमधील शॉप नं. २ मध्ये “एस.पी. बॉडी फिटनेस” या नावाने मसाज सेंटर चालवले जात होते. या सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाला (AHTU) मिळाली होती.
​मिळालेल्या माहितीची पडताळणी करण्यासाठी पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली बनावट ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली. खात्री पटताच पोलिसांनी दिनांक ८ मे २०२६ रोजी तिथे अचानक छापा टाकला. या कारवाईत मसाज सेंटरमध्ये असलेल्या ५ पीडित महिलांची सुटका करण्यात आली.
​मॅनेजरला अटक
​या मसाज सेंटरची मालकीण आणि मॅनेजर आशा मुकेश गोरे (वय ५५ वर्ष, रा. गंगा व्हिलेज हांडेवाडी, हडपसर) हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिच्या विरुद्ध हडपसर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (भा.न्या.स.) कलम १४३ (१) (३) आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​या पथकाने केली कारवाई
​ही कारवाई पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) विवेक मासाळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
​या पथकात पोलीस निरीक्षक छगन कापसे, पोलीस उप निरीक्षक विशांत चव्हाण, तसेच पोलीस अंमलदार आंधळे, भिवरकर, जाधव, केदार, रसाळ, कोंडे आणि महिला पोलीस अंमलदार खेडेकर यांचा समावेश होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

​कर्बलाच्या शहीदांच्या स्मरणार्थ एकतेची मिसाल: मोहरमच्या रात्री पुण्यात सरबतासाठी मोफत साखर वाटप

​पुणे, दि. २५ जून २०२६: मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना 'मोहरम'च्या नवव्या दिवशी, म्हणजेच 'कत्तलची रात्र' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रात्री, 'पंजेतन पवित्र संघटना, महाराष्ट्र राज्य' यांच्या...

मुंबई लोकल हत्या: ‘सोशल मीडिया ट्रायल’मुळे आमच्या आयुष्यावर, नोकऱ्यांवर परिणाम; असे आरोपीच्या कुटुंबीयांचे म्हणणे...

सोशल मीडिया ट्रायलमुळे आमचे जीवन आणि नोकऱ्यांवर परिणाम होत आहे, असे मुंबई लोकल ट्रेनवर चाकूहल्ला करणाऱ्या आरोपीचे नातेवाईक म्हणतात मुंबई: मुंबई लोकल ट्रेनमध्ये...

सोनम रघुवंशी तुरुंगातून बाहेर आल्याने सिया गोयलने केतन अग्रवालची हत्या केली: राजाची आई. पुणे...

पुणे : पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येवर इंदूरचा खून झालेला व्यापारी राजा रघुवंशी यांच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून, सोनम रघुवंशी...

मुंबई आणि पुण्यात पाणी साचल्याने सुप्रिया यांनी भाजपवर निशाणा साधला. पुणे बातम्या

बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात सर्वत्र पाणी साचले आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. ताथवडे येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनांची वाहतूक विस्कळीत...

‘तिने प्लॅन केला, नाही त्याने माझ्यावर जबरदस्ती केली’: पुणे रिअल्टरच्या खून प्रकरणात ट्विस्ट आणि...

गहुंजे रियाल्टर केतन अग्रवाल यांच्या खून प्रकरणाला नवे वळण लागले आहे - दोन आरोपी - त्याची मंगेतर सिया गोयल (सी) आणि तिचा 'पार्टनर'...

error: Content is protected !!