रायकर व जाधव यांना जबरी मारहाण ताबा घेण्यासाठी केली बेकायदेशीर जमीन बळकावल्याचा कट यवत पोलीस स्टेशन हद्दीतील प्रकार.
पुणे यवत, प्रतिनिधी पुणे जिल्हा , दिनांक : १९ मे,
यवत पोलीस स्टेशन हद्दीत जमिनीच्या वादातून रायकर व जाधव कुटुंबीयांना जबरी मारहाण करून संबंधित व्यक्ती मनुष्य बळावर रायकर व जाधव या कुटुंबियांची जमीन लाटण्याचा प्रयत्न करत आहे. संबंधित हे कायदेशीर ताबा घेणाऱ्यावर कारवाई करून आम्हाला न्याय द्या अशी मागणी एस पी साहेबांना तक्रारी अर्ज देऊन कुटुंबीयांनी केले.
सुभाष रायकर राहणार इंदिरानगर यवत, व कृष्णा बाबू जाधव यांना संबंधित जागा बळखणाऱ्या व्यक्तीकडून जीवास धोका असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तसेच त्यांच्या मालकी हक्काची 76 गुंठे जागा असून ती जागा संबंधित ताब्या वाला व्यक्ती बेकायदेशीर रित्या बळकवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी त्या व्यक्तीने वीस बाऊन्सर महिला व व पुरुषांसमवे त्यांच्या जागेवर जाऊन रायकर व जाधव कुटुंबीयांना घरात घुसून दमदाटी करून मारहाण केली असल्याची धक्कादायक घटना यवत पोलीस स्टेशन हद्दीत घडलेली आहे तसेच सुभाष रायकर व कृष्णा जाधव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली जातिवाचक शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक त्यांना दिली गेली व त्यांच्या महिलांना मारहाण करून शिवीगाळ करण्यात आली असे यावेळी त्यांनी माध्यमांना सांगितले 112 ला फोन केला असता पोलिसांनी देखील बेकायदेशीर ताबा घेणाऱ्या व्यक्तीची बाजू घेऊन पोलीस स्टेशन वरून जाधव रायकर यांना हाकलून लावले व कोणीही दखल घेतली नाही संबंधित प्रकार उघडकीस आणण्यासाठी त्यांनी आज सुपरिडंट ऑफ पोलीस एसपी साहेब यांना तक्रारी अर्ज देऊन तात्काळ गुन्हे दाखल करावे अशी मागणी या कुटुंबाच्या वतीने करण्यात आली, एस पी साहेब यांनी देखील संपूर्ण प्रकार ऐकताच यवत पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक यांना तात्काळ गुन्हा दाखल करा असे आदेश देण्यात आले. यावेळी (1) अमित आदमाने : सदस्य : राष्ट्रीय मनवाधिकार आयोग भारत
(2) संगीता ताई वानखेडे : सामाजिक कार्यकर्त्या दौंड तालुका
(3) नाना साहेब अवचिते : संस्थापक अध्यक्ष ज्यागवार ग्रुप ऑल इंडिया
(4) सनी भाऊ डाडर : पद : संस्थापक अध्यक्ष लहुजी शासन ग्रुप [ महाराष्ट्र राज्य ]
(5) सोमनाथ गावडे : सामाजिक कार्यकर्ते लोणी काळभोर
(6) संतोष खोमणे : सामाजिक कार्यकर्ते हडपसर
(7) साबळे ताई : आर पी आय अध्यक्ष हडपसर
(8) डोंगरे वकील,
(9) बोरसे वकील
(10) पत्रकार लांडगे ताई
(11) संगम सिंग टाक : इंडियन क्राईम न्यूज प्रभारी
(12 ) संगीता ताई वानखेडे : स्त्री शक्ती संस्था अध्यक्ष
आदी पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्तित होते.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























