पुणे, दि. १५ एप्रिल २०२६ :
पुणे शहर पोलिसांच्या वाघोली पोलीस ठाण्याने एमडी (मेफेड्रॉन) या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोन संशयित आरोपींना अटक करून एकूण ३७ ग्रॅम ३ मिलीग्रॅम एमडी पावडर, एक मोबाईल आणि दोन कार असा एकूण ३१,०६,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कारवाईची पार्श्वभूमी
दिनांक ०५ एप्रिल २०२६ रोजी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांना विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की, वाघोली परिसरातील आशियाना लॉज जवळ, सातव वस्ती रोड, मोकळ्या जागेत काही संशयित व्यक्ती अमली पदार्थांची अवैध विक्री करीत आहेत. या माहितीच्या आधारे तपास पथक अधिकारी व गुन्हे प्रतिबंध पथकाने तात्काळ सापळा रचला.
पहिली अटक : योगेश कणगरे
पोलीस अंमलदार प्रदीप मोटे व विशाल गायकवाड यांनी घटनास्थळी संशयित इसमास हटकले असता तो घाईगडबडीत जाऊ लागला. त्याची झडती घेतली असता त्याचे नाव योगेश सुभाष कणगरे, वय ३८ वर्षे, रा. रूम नं. ३, शिवकृपा बिल्डींग, लेन नंबर ३, साई नगर, लोहगाव, पुणे असे निष्पन्न झाले.
त्याच्याकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला :
एमडी (मेफेड्रॉन) पावडर – ५ ग्रॅम ४ मिलीग्रॅम – किंमत ₹१,०८,०००/-
एक चारचाकी (कार) – किंमत ₹३,००,०००/-
या प्रकरणी गु.र.नं. २२१/२०२६, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क) व २१(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसरी अटक : सोनू सिंह ऊर्फ मनुवेंद्र
चौकशी दरम्यान योगेश कणगरे याने सांगितले की, त्याला एमडी पावडर त्याचा मित्र सोनू सिंह याच्याकडून मिळत असे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोनू सिंह ऊर्फ मनुवेंद्र ऊर्फ सोनू शंकर सिंह, वय ४२ वर्षे, रा. फ्लॅट नं. १, स. नं. ३४/१, विद्यानगर, गुड विल रेसिडेन्सी, लेन नं. १३, टिगरेनगर, पुणे यास शोधून काढून अटक केली.
त्याच्या अंगझडतीमध्ये व घरातील पार्किंगमध्ये सापडलेला एकूण मुद्देमाल :
एमडी पावडर (अंगावर) – ८ ग्रॅम ७ मिलीग्रॅम – किंमत ₹१,७४,०००/-
होंडा ॲक्टिव्हा दुचाकी – किंमत ₹५०,०००/-
ओप्पो कंपनीचा मोबाईल – किंमत ₹१०,०००/-
एमडी पावडर (पार्किंगमध्ये) – २३ ग्रॅम २ मिलीग्रॅम – किंमत ₹४,६४,०००/-
ऑडी कंपनीची कार – किंमत ₹२०,००,०००/-
एकूण जप्त मुद्देमाल
तपशील
किंमत
एमडी पावडर – ३७ ग्रॅम ३ मिलीग्रॅम
₹७,४६,०००/-
दोन कार (चारचाकी)
₹२३,०००,००/-
दुचाकी व मोबाईल
₹६०,०००/-
एकूण
₹३१,०६,०००/-
पुढील तपास
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल करीत आहेत.
मार्गदर्शन व पथकाचे योगदान
ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) श्री. मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ७ श्री. सोमय मुंडे, सहा. पोलीस आयुक्त लोणीकंद विभाग श्री. नुतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली श्री. नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती पल्लवी मेहेर, सहा. पोलीस निरीक्षक विनायक अहिरे तसेच पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे, प्रदीप मोटे, मंगेश जाधव, सुनील कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दिपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रितम वाघ, शिवाजी चव्हाण, मारुती वाघमारे, अशोक शेळके, अमोल सरतापे, गहिनाथ बोयणे, अमोल ढोणे (लोणीकंद पो.स्टे.) यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























