शेतकऱ्यांचा विजय!
दिवसा वीजपुरवठ्याची मागणी अखेर मान्य – आजपासून अंमलबजावणी सुरू
मौजे थेऊर, कोलवडी-साष्टे, नायगाव आणि हिंगणगाव परिसरातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी शेतीपंपांसाठी दिवसा वीजपुरवठा मिळावा, अशी मागणी करत होते. रात्रीच्या वेळी वाढत्या बिबट्यांच्या वावरामुळे आणि हल्ल्यांच्या धोक्यामुळे शेतात जाणे अत्यंत जोखमीचे झाले होते.
शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्येचा पाठपुरावा मागील १५ दिवसांपासून MSEB कडे सातत्याने सुरू होता. त्याच अनुषंगाने काल सकाळी MSEB च्या रास्तापेठ कार्यालयात, मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. बैकर साहेब यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन देत तातडीची मागणी करण्यात आली.
MSEB कडून तातडीची कार्यवाही
शेतकऱ्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत MSEB ने तात्काळ निर्णय घेत आजपासूनच दिवसा वीजपुरवठा सुरू केला आहे.
शेतकऱ्यांच्या दीर्घकाळच्या मागणीला यश मिळाले
आज सकाळपासूनच दिवसा वीज मिळू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. धोका टळून शेतीकाम सुरळीत पार पडण्यास मोठी मदत होणार आहे.
“सेवेशी ठायी तत्पर — हिरोजी इंदुलकर”
स्थानिक समस्यांसाठी सातत्याने प्रयत्न करून शेतकऱ्यांची दीर्घकाळची मागणी मान्य करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























