संकष्टी चतुर्थी विशेष दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी – श्री चिंतामणी मंदिर परिसरात दिवसभर उत्साही वातावरण
आज मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थीनिमित्त चिंचवड येथील श्री चिंतामणी देवस्थानात पहाटेपासून भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. श्रींच्या दर्शनासाठी पहाटेच रांगा लागल्या होत्या. पहाटे पुजारी महेश आगलावे यांच्या हस्ते विधिवत पूजा पार पडली.
,
देवस्थानच्या वतीने श्री चिंतामणीची महापूजा संपन्न झाली. यावेळी देवस्थानचे विश्वस्त मा. श्री केशव उमेश विद्वांस यांनी उपस्थित राहून संपूर्ण व्यवस्थेवर लक्ष ठेवले.
मंदिर परिसरात भाविकांच्या सोयीसाठी दर्शनबारी, पिण्याच्या पाण्याची सोय तसेच मंदिराबाहेर मांडवांची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी देवस्थानतर्फे उपवासाची खिचडी भाविकांना वाटण्यात आली.
सायंकाळी चिंतामणी भजनी मंडळाच्या सुमधुर साथीने ह.भ.प. फाळके महाराज, आळंदी यांच्या सुभाष्य कीर्तनाने भक्तिमय वातावरण रंगले. चंद्रोदयानंतर श्री चिंतामणींचा छबिना भाविकांच्या जयघोषात निघाला. छबिनानंतर ग्रामस्थांच्या वतीने भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.
गर्दीची शक्यता लक्षात घेऊन देवस्थानने जादा सुरक्षा यंत्रणा तैनात केली होती. तर ग्रामपंचायतीतर्फे पार्किंगची सोय करण्यात आली होती. दिवसभर मंदिर परिसरात भक्तिमय, शांत आणि उत्साही वातावरण अनुभवायला मिळाले.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























