अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे शहराची जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी
पुणे, दि. ८ ऑक्टोबर — : राज्यभरात झालेल्या अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या काळात विद्यमान तसेच पूर्वीच्या सरकारकडून देण्यात आलेल्या सरसकट कर्जमुक्तीच्या आश्वासनाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. परिणामी, शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे शहराच्या वतीने जिल्हाधिकारी पुणे यांना निवेदन देऊन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, उत्पादन खर्चात वाढ, हमीभावापेक्षा कमी दर, महागडी खते व औषधे यामुळे शेती तोट्यात गेली आहे. त्यातच सावकारी कर्ज, बँकांचे थकबाकीदार खाते, जप्तीच्या कारवाया आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना वाढत आहेत. शासनाने तातडीने ठोस पावले उचलून शेतकऱ्यांना दिलासा देणे अत्यावश्यक असल्याचे शिवसेनेच्या प्रतिनिधींनी सांगितले.
शिवसेनेच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :
1. अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर रु. ५०,००० इतकी थेट आर्थिक मदत त्वरित देण्यात यावी.
2. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या कर्जातून पूर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी.
3. पीक विमा योजनेतील कठोर निकष शिथिल करून पंचनाम्याशिवाय विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी.
4. अतिवृष्टीमुळे घरे व पशुधनाचे नुकसान झालेल्या नागरिकांना जुने निकष न लावता योग्य व पुरेसा मोबदला तातडीने देण्यात यावा.
शिवसेनेच्या प्रतिनिधींनी शासनाचे लक्ष शेतकऱ्यांच्या गंभीर स्थितीकडे वेधले असून, मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशाराही या वेळी देण्यात आला.
या प्रसंगी पुणे शहरप्रमुख संजय मोरे आणि गजानन थरकुडे, माजी शहरप्रमुख रामभाऊ पारिख, उपशहरप्रमुख भरत कुंभारकर, प्रशांत राणे, आबा निकम, विभागप्रमुख उत्तम भुजबळ, राजेश मोरे, मुकुंद चव्हाण, रूपेश पवार, गोविंद निंबाळकर, हेमंत यादव, मयुर भांडे, संजय वाल्हेकर, सचिन घोलप, पराग थोरात, दिपक जगताप, वाहतूक सेनेचे दत्ता घुले, मारुती ननावरे, हर्षद ठकार, राजद्र शिंदे, मकरंद पेठकर, नागेश खडके, महिला आघाडीच्या अमृतताई पठारे, निकीता मारटकर, ज्योती चांदेरे, मृण्मयी लिमये, सविता गोसावी, युवासेना शहर अधिकारी सनी गवते, गिरीश गायकवाड, सोहम जाधव, नीरज नांगरे, नितीन निगडे, मिलिंद पत्की, हनुमंत यादव, राहुल शेडगे, बंडूनाना बोडके, विजय नरवडे, प्रकाश निकम, शशिकांत साटोटे, परवेश राव, अभिषेक जगताप, जुबेर शेख, मोहम्मद अन्सारी, पांडुरंग कांबळे, संतोष ढोरे, प्रविण रणदिवे, संजय साबणे, संजय टापसे, राजेंद्र शहा, योगेश खरात, राजु पवार, शिवम खोपडे, राजेश माने, प्रदीप विश्वासराव, अनिल माझिरे, अमोल घुमे, अनिल परदेशी, किरण जाधव, बाळासाहेब गरुड आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
⸻
अनंत रामचंद्र घरत
प्रसिद्धी प्रमुख पुणे शहर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – पुणे शहर

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























