पुणे : सार्वजनिक रस्त्यावर टेबल ठेवून आणि केक कापून वाढदिवस साजरा करणे येरवड्यातील गाडीतळ येथील एका माजी नगरसेवकाला शुक्रवारी पहाटे एकच्या सुमारास महागात पडले. त्यांच्या मुलासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस हवालदार बलजित बाबुराव थोरात (वय 40) यांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. माजी नगरसेवक कार्यालयासमोरील सार्वजनिक रस्त्यावर ही घटना घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी नगरसेवक शुक्रवारी वाढदिवस साजरा करणार होते. पहाटे एकच्या सुमारास फटाकेही फोडण्यात आले. उत्सवाला उपस्थित असलेल्या नगरसेवकाच्या मुलाने व इतरांनी सार्वजनिक शांतता भंग करून रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























