Homeताज्या बातम्यागणेशोत्सवात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची येरवडा पोलीस ठाण्याला भेट | नागरिकांशी...

गणेशोत्सवात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची येरवडा पोलीस ठाण्याला भेट | नागरिकांशी मनमोकळा संवाद

गणेशोत्सवात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची येरवडा पोलीस ठाण्याला सदिच्छा भेट; रात्री ११ वाजता नागरिकांशी साधला मनमोकळा संवाद

पुणे, दि. १९ सप्टेंबर २०२६ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराचे पोलीस आयुक्त मा. श्री. अमितेश कुमार यांनी शनिवारी रात्री ११ वाजता येरवडा पोलीस ठाण्याला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी पोलीस ठाण्यातील श्री गणेशाची आरती करून उपस्थित नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला.

दरम्यान पोलीस आयुक्त येरवडा पोलीस ठाण्यात येणार असल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच विघ्नहर्ता ट्रस्टचे समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित झाले.

श्री गणेशाची आरती केल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. यावेळी डीजे-मुक्त दहीहंडी तसेच ईद-ए-मिलादचा सण शांततामय आणि सलोख्याच्या वातावरणात साजरा करण्यासाठी नागरिकांची सर्वसमावेशक सहमती मिळवून घेतल्याबद्दल येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उमेश गित्ते आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे त्यांनी अभिनंदन व कौतुक केले. तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, कल्याणी नगर परिसरात ध्वनी प्रदूषणाविरोधात जनजागृती तसेच विविध उपक्रम राबविणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती मोनिका शर्मा आणि त्यांच्या टीमतर्फे येरवडा पोलिसांनी कल्याणी नगर परिसरात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल हस्तलिखित शुभेच्छा संदेश तयार करण्यात आला होता. हा संदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उमेश गित्ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांना प्रदान करण्यात आला.

सामान्य नागरिकांमध्ये सहजपणे मिसळून त्यांच्या समस्या जाणून घेणे, त्यावर कायदेशीर व प्रभावी उपाययोजना करणे आणि नागरिकांचा विश्वास संपादन करून लोकाभिमुख पद्धतीने कार्य करणे, या येरवडा पोलिसांच्या कार्यपद्धतीचे उपस्थित नागरिकांनी कौतुक केले.
‘नागरिकांचा विश्वास, पोलिसांचा सेवाभाव आणि कायद्याचा सन्मान’ या त्रिसूत्रीच्या माध्यमातून येरवडा पोलीस ठाण्याची लोकाभिमुख वाटचाल अशीच सुरू राहावी, अशा शुभेच्छांसह कार्यक्रमाची सांगता झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे पोलिसांच्या ‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत मोठी कारवाई; चंदननगर हद्दीतून २ गावठी पिस्टल व जिवंत...

​पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपायुक्त, परिमंडळ-७ यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या 'मिशन क्रॅकडाऊन' मोहिमेत पोलिसांना मोठे यश आले आहे. चंदननगर पोलीस...

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या तब्बल २६ जणांवर मुंढवा पोलिसांची कायदेशीर कारवाई

पुणे: पुण्यातील मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या एकूण २६ जणांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. ​सप्टेंबर महिन्यामध्ये सोशल मीडियावरील ‘इन्स्टाग्राम’ (Instagram) माध्यमातून मुंढवा...

मुंढवा पोलिसांची धडक कारवाई; ५०,५१८ रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि विनापरवाना गॅस विक्री करणाऱ्यावर...

​पुणे: मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि विनापरवाना गॅसची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या इसमावर मुंढवा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण...

​बाणेरच्या ९०० ते १२०० कोटींच्या वक्फ जमिनीचा ९.५१ कोटींचा व्यवहार अखेर रद्द; वक्फ मंडळाचा...

पुणे : बाणेर येथील हजरत उडणशाह वली दर्गा आणि बाणेर मशिदीशी संबंधित ७ हेक्टर ३४ आर, म्हणजेच १८ एकरांहून अधिक बहुमूल्य वक्फ जमिनीच्या वादात...

बाणेर वक्फ जमीन विवाद: वक्फ बोर्डाच्या निर्णयाचे ‘मिस फरहा चॅरिटेबल फाऊंडेशन’कडून स्वागत

​पुणे: बाणेर येथील बहुचर्चित वक्फ जमिनीच्या प्रकरणात महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे 'मिस फरहा चॅरिटेबल फाऊंडेशन' (Miss Farha Charitable Foundation) ने स्वागत...

error: Content is protected !!