Homeताज्या बातम्यामोक्का गुन्ह्यातील १ वर्षापासून पसार असलेला आरोपी बेंगळुरु येथून जेरबंद

मोक्का गुन्ह्यातील १ वर्षापासून पसार असलेला आरोपी बेंगळुरु येथून जेरबंद

पुणे, १५ सप्टेंबर २०२६:
पुणे शहर पोलीस दल आणि खराडी पोलीस स्टेशनच्या पथकाने एक मोठी कारवाई करत मोक्का (MCOCA) गुन्ह्याखाली मागील एक वर्षापासून फरारी असलेल्या मुख्य आरोपीला कर्नाटक राज्यातील बेंगळुरु येथून अटक केली आहे. आकाश उर्फ मुन्ना अनिल देवकर (वय २९ वर्षे, रा. येरवडा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
​काय आहे नेमकी घटना?
​दिनांक ०५ ऑगस्ट २०२५ रोजी इवॉन खराडी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीच्या साईटवर काही इसमांनी मोटारसायकलवरून येऊन फौजदारी स्वरूपाचे अतिक्रमण केले होते. आरोपी राजु अस्वले व त्याच्या ९ साथीदारांनी कंपनीच्या परिसरात दहशत निर्माण करून कंपाऊंडमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादीकडे ५ लाख रुपयांची खंडणी मागून कंपनीच्या मालकाला जीवे मारण्याची आणि कंपाऊंड उखडून टाकण्याची धमकी दिली होती.
​या प्रकरणी दिनांक ०६ ऑगस्ट २०२५ रोजी खराडी पोलीस स्टेशनमध्ये भा.न्या.सं. कलम १११(२ब), (४), ३०८, १८९, १९०, १९१, ३२९, ११५, ३५१, ३५२ तसेच क्रिमिनल लॉ अमेन्डमेंट ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याची तीव्रता पाहता यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका – MCOCA) १९९९ चे कलमीकरण करण्यात आले होते. या गुन्ह्यात यापूर्वी ८ आरोपींना अटक झाली होती, मात्र आकाश देवकर हा तेव्हापासून फरार होता.
​पोलिसांची धडक कारवाई व गिरफ्तारी
​वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खराडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीच्या आधारे दिनांक ०९ सप्टेंबर २०२६ रोजी बेंगळुरु येथील हेगडे नगरमधून पसार आरोपी आकाश देवकर याला जाळ्यात अडकवून बेड्या ठोकल्या. या प्रकरणाचा पुढील तपास खराडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

​मा. न्यायालयाच्या कक्षात दंगा व धक्काबुकी करणाऱ्या आरोपींवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; न्यायालयाने...

​मा. न्यायालयाच्या कक्षात दंगा व धक्काबुकी करणाऱ्या आरोपींवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; न्यायालयाने केला दंड ​पुणे: मा. न्यायालयाच्या कक्षात दंगा करून, शांततेस बाधा निर्माण करत...

आंतरराज्यातील घरफोडी करणारे दोन आरोपी २४ तासांत जेरबंद; ७ लाख ७ हजार ३६० रुपयांचा...

कोथरुड पोलीस स्टेशनची मोठी कारवाई: आंतरराज्यातील घरफोडी करणारे दोन आरोपी २४ तासांत जेरबंद; ७ लाख ७ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त ​पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या...

बनावट सोशल मीडिया खात्यांद्वारे तरुणास ब्लॅकमेल करून १.७७ लाखांची खंडणी उकळणाऱ्या आणि आत्महत्येस प्रवृत्त...

पुणे: खराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंस्टाग्राम व टेलिग्रामवरील बनावट खात्यांच्या माध्यमातून तरुणाला खोट्या ड्रग्जच्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून वारंवार ब्लॅकमेल केले. तसेच त्याच्याकडून १,७७,००० रुपयांची...

२० वर्षे पोलिसांना हुलकावणी, अखेर कायद्याच्या कचाट्यात! येरवडा पोलिसांची यशस्वी कारवाई

पुणे पोलिसांची मोठी कारवाई! २० वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला येरवडा पोलिसांनी परळीतून केली अटक पुणे | प्रतिनिधी पुणे शहरातील येरवडा पोलीस ठाण्याच्या पथकाने गेल्या सुमारे २०...

जुन्नर तालुक्यात रात्रीच्या वेळी घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड; ३८ लाख ५० हजारांचा मुद्देमाल...

​पुणे : जुन्नर तालुक्यात आणि परिसरामध्ये रात्रीच्या वेळी घरफोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीला पुणे ग्रामीण एलसीबी (स्थानिक गुन्हे शाखा) आणि ओतूर पोलिसांनी...

error: Content is protected !!