पुणे (ग्रामीण):
खेड तालुक्यातील वाडा येथील भांबुर्डेकर ज्वेलर्स दुकानात डल्ला मारणाऱ्या दोन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व खेड पोलीस स्टेशनच्या पथकाने गजाड केले आहे. या कारवाईत पोलिसांनी १० गुन्हे उघडकीस आणले असून, आरोपींकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला एकूण ६,००,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल यशस्वीरित्या हस्तगत करण्यात आला आहे.
घटना व पार्श्वभूमी:
दिनांक २२/०७/२०२६ रोजी खेड पोलीस स्टेशन हद्दीतील वाडा येथील भांबुर्डेकर ज्वेलर्स दुकानात चोरीची गंभीर घटना घडली होती. या प्रकरणी खेड पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. ४३७/२०२६, भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ३३१(४), ३०५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला हा गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याच्या सख्त सूचना दिल्या होत्या.
समांतर तपास आणि सापळा:
पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने समांतर तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान वाडा परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासण्यात आले, सराईत गुन्हेगारांची माहिती काढण्यात आली तसेच गोपनीय बातमीदारांमार्फत खबऱ्यांकडून महत्त्वाची माहिती हाती लागली.
वाडा, ता. खेड येथील लक्ष्मी रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्र शेजारील भांबुर्डेकर ज्वेलर्समध्ये चोरी करणारे इसम खरपुडी गावाच्या हद्दीतून चोरीचे साहित्य घेऊन मोटारसायकलवरून जाणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस पथकाला मिळाली. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खरपुडी गावाच्या हद्दीत भीमा नदीच्या काठाजवळ पुलाजवळ सापळा रचला. यावेळी चार इसم मोटारसायकलवरून पोत्यात काहीतरी संशयास्पद घेऊन जाताना दिसले.
आरोपींची नावे व कारवाई:
पोलिसांनी तत्परता दाखवत खालीलप्रमाणे संशयितांना ताब्यात घेतले:
१. पवित्र विनोद ठाकूर (वय २० वर्षे)
२. उमेश विनोद ठाकूर (वय २२ वर्षे)
(दोघेही रा. पत्रावस्ती वाकी बुद्रुक, ता. खेड, जि. पुणे)
यांच्यासह दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांनाही ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्यांनी वाडा येथील भांबुर्डेकर ज्वेलर्सचे शटर पहार व कटरच्या सहाय्याने उचकटून सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी केल्याची कबुली दिली. तसेच खेड, आंबेगाव आणि शिरूर तालुक्यांमध्ये विविध ठिकाणी घरफोडीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
आरोपींकडून एकूण ३.२६७ किलोग्राम वजनी चांदी, ५ मोबाईल फोन, रोख रक्कम, तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेले लोखंडी कटर, पहार, पकड, ड्रायव्हर, हातोडा आणि दोन मोटारसायकल असा एकूण ६,००,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल व साहित्य जप्त करण्यात आले आहे.
उघडकीस आलेले १० गुन्हे:
चौकशीदरम्यान त्यांनी खालीलप्रमाणे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे:
१. खेड पोलीस स्टेशन गु.र.नं. ४३७/२०२६, भा.न्या.सं. कलम ३३१(४), ३०५(अ)
२. खेड पोलीस स्टेशन गु.र.नं. २०६/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०५(अ), ३१४(४)
३. खेड पोलीस स्टेशन गु.र.नं. २३१/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०५(अ), ३१४(४)
४. खेड पोलीस स्टेशन गु.र.नं. २८३/२०२६, भा.न्या.सं. कलम ३३१(१), ३३१(४), ६२
५. घोडेगाव पोलीस स्टेशन गु.र.नं. १४१/२०२६, भा.न्या.सं. कलम ३३१(१), ३३१(४), ३०५(अ)
६. घोडेगाव पोलीस स्टेशन गु.र.नं. १९०/२०२६, भा.न्या.सं. कलम ३३१(१), ३३१(४), ३०५(अ)
७. घोडेगाव पोलीस स्टेशन गु.र.नं. १५८/२०२५, भा.न्या.सं. कलम ३३१(१), ३३१(४), ३०५(अ)
८. घोडेगाव पोलीस स्टेशन गु.र.नं. १५५/२०२५, भा.न्या.सं. कलम ३३१
९. शिक्रापूर पोलीस स्टेशन गु.र.नं. ६५५/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०९(६), ३(५)
१०. शिक्रापूर पोलीस स्टेशन गु.र.नं. ६९८/२०२६, भा.न्या.सं. कलम ३३४(१), ३०५(अ)
सदर आरोपींना दिनांक १९/१०/२०२६ रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली असून पुढील तपास खेड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महेश गरड करत आहेत.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























