Homeताज्या बातम्या"७ अनाधिकृत होर्डिंग्ज नक्की कोण वाचवत आहे.? तक्रारीनंतरही आकाशचिन्ह विभाग मौन की...

“७ अनाधिकृत होर्डिंग्ज नक्की कोण वाचवत आहे.? तक्रारीनंतरही आकाशचिन्ह विभाग मौन की मूक पाठिंबा?”

पुणे:-
पुणे शहरातील शेकडो अनधिकृत होर्डिंग्जचा विषय पुणे महानगरपालिकेसाठी तापदायक ठरत असतानाच, प्रशासनाकडून काही ठराविक प्रकरणांमध्ये कारवाईबाबत जाणीवपूर्वक मौन धारण करण्यात येत असल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. टिळक रोडवरील एस. पी. कॉलेजच्या आवारात उभे असलेले ७ होर्डिंग्ज पूर्णपणे अनधिकृत असून, यासंदर्भात २१ मे २०२६ रोजी अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली होती.
​प्राप्त माहितीनुसार, यांतील ५ होर्डिंग्जबाबत संबंधित मालक कंपनी आणि शिक्षण प्रसारक मंडळींनी नोटराईज्ड करार (Notarized Agreement) करून शासनाची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, पुणे शहर यांच्याकडून शिक्षण प्रसारक मंडळी या संस्थेस दिनांक १ जुलै २०२६ आणि त्यानंतर पुन्हा ५ ऑक्टोबर २०२६ रोजी अशा दोन वेळा कायदेशीर नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
​शासकीय फसवणुकीचे गंभीर प्रकरण:
याच शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेच्या आवारातील आणखी २ अनाधिकृत होर्डिंग्जवर कारवाईसाठी १९ मे २०२६ रोजी युवक काँग्रेसचे शहर सरचिटणीस सागर धाडवे यांनी पहिली तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात होर्डिंगधारक आणि शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेने पुणे महानगरपालिका तसेच महाराष्ट्र शासनाची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे. माहिती अधिकारांतर्गत (RTI) मिळालेल्या कागदपत्रांनुसार, संबंधित होर्डिंगधारक व्यावसायिक आणि शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेमध्ये कोणताही वैध भाडेकरार झालेलाच नाही, हे स्पष्ट झाले आहे.
​आकाशचिन्ह विभागाची संदिग्ध भूमिका:
या सर्व गंभीर प्रकरणांविषयी पुणे महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वारंवार तक्रार करूनही, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. विशेष म्हणजे, आजदेखील या अनधिकृत जाहिरात फलकांवरून अनधिकृतपणे लाखो रुपयांची कमाई चालूच आहे. कायदेशीर पुरावे आणि मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटिसा असतानाही आकाशचिन्ह विभाग कारवाईबाबत एवढी दिरंगाई का करत आहे? असा संतप्त सवाल या निमित्ताने निर्माण झाला आहे.
​आंदोलनाचा इशारा:
अनधिकृतपणे शासनाची फसवणूक करून आणि या दोन्ही प्रकरणांत धर्मादाय आयुक्त कार्यालयाचीही फसवणूक झालेली असताना, पुराव्यासहित वारंवार तक्रारी देऊनही जर कारवाई होणार नाही, तर पुणे महानगरपालिकेच्या बाहेर तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तक्रारदार तथा युवक काँग्रेस पुणे शहरचे सरचिटणीस सागर धाडवे यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बोपोडी येथे धम्मदीक्षा अनुकरण सोहळा उत्साहात संपन्न; भीमअनुयायांच्या उपस्थितीने परिसर धम्ममय!

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बोपोडी येथे धम्मदीक्षा अनुकरण सोहळा उत्साहात संपन्न; भीमअनुयायांच्या उपस्थितीने परिसर धम्ममय! पुणे (शशिकांत पाटोळे) : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक...

खेड तालुक्यातील वाडा येथील भांबुर्डेकर ज्वेलर्स दुकानात चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद; १० गुन्हे...

पुणे (ग्रामीण): खेड तालुक्यातील वाडा येथील भांबुर्डेकर ज्वेलर्स दुकानात डल्ला मारणाऱ्या दोन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व खेड पोलीस स्टेशनच्या पथकाने गजाड केले आहे....

औंध नगर आणि विद्यापीठ भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न;

औंध नगर आणि विद्यापीठ भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न; पुणे (शशिकांत पाटोळे) : औंध नगर आणि विद्यापीठ भागातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वार्षिक...

बाणेरमध्ये जबरी चोरी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला पोलिसांकडून जेरबंद; सोन्याचे दागिने व रोकड हस्तगत

पुणे: पुण्यातील बाणेर परिसरात रात्रीच्या सुमारास नागरिकाला अडवून मारहाण करत सोन्याचे दागिने आणि ऑनलाईन पैसे जबरदस्तीने ट्रान्सफर करून लूटमार करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला बाणेर पोलीस...

बोपोडीतील वादग्रस्त ‘अॅनिमल इन्सिनरेटर’ प्रकल्प: नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न आणि तीव्र रोष

पुणे महानगरपालिकेच्या (PMC) मनमानी कारभाराचा आणि नियोजनाचा फटका आता पुन्हा एकदा उपनगरांना बसू लागला आहे. बावधन येथील तीव्र विरोधामुळे रखडलेला मृत प्राण्यांच्या दहनाचा प्रकल्प...

error: Content is protected !!