पुणे शहरातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने विधीसंघर्षीत बालक आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पुणे व इतर ठिकाणांहून चोरी केलेल्या एकूण १० लाख रुपये किंमतीच्या १४ मोटार सायकली हस्तगत केल्या आहेत. या कारवाईमुळे पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच इतर जिल्ह्यांमधील एकूण १२ गुन्हे उघडकीस आले आहेत.
गुन्ह्याची पार्श्वभूमी आणि समांतर तपास
विश्रामबाग पोलीस स्टेशन गु.र.नं. २२३/२०२६, भा.न्या.सं.क. ३०३ (२) नुसार, फिर्यादी यांनी त्यांची होन्डा शाईन गाडी (नं. एम.एच. ३७ ए बी ३८७२) चिमणबाग सोसायटी, टिळक हॉटेल, नवीन पेठ, पुणे येथे २३ जून २०२६ रोजी रात्री १२:३० वाजता लॉक करून पार्क केली होती. रात्रीच्या वेळी ती अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार त्यांनी दिली होती. या गुन्ह्याच्या अनुषंगाने विश्रामबाग पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश कारके यांनी आपल्या टीमसह समांतर तपास सुरू केला.
आरोपींची धरपकड आणि तपासातील उलगडा
तपासादरम्यान मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय बातमीनुसार, नारायण पेठेत दोन संशयित इसम थांबले असल्याची माहिती मिळाल्यावर पथकाने तिथे जाऊन खात्री केली. पाहणी करताना वर्णनानुसार दोन मुले दिसली, त्यापैकी एक इसम अंधाराचा फायदा घेऊन गल्लीबोळातून पळून गेला, तर दुसऱ्या अल्पवयीन मुलास एका दुचाकीसह पकडण्यात आले. नातेवाईकांसमक्ष चौकशी केली असता, त्याने साथीदाराच्या मदतीने पुणे व इतर ठिकाणांहून गाड्या चोरी करून त्यातील दोन गाड्या कृष्णा चंद्रकांत शेळके (वय २६ वर्षे, रा. अहमदपूर, लातूर) यास विकल्याचे सांगितले. या माहितीच्या आधारे कृष्णा शेळके यास लातूर येथून ताब्यात घेऊन गुन्ह्यात अटक करण्यात आली.
उघडकीस आलेले गुन्हे व जप्त मुद्देमाल
तिन्ही आरोपींनी मिळून वेगवेगळ्या कंपन्यांच्या १४ मोटार सायकली चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत:
विश्रामबाग पोलीस स्टेशनकडील २ गुन्हे
समर्थ पोलीस स्टेशनकडील १ गुन्हा
हडपसर पोलीस स्टेशनकडील १ गुन्हा
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील १ गुन्हा
विमानतळ पोलीस स्टेशनकडील १ गुन्हा
काळेवाडी पोलीस स्टेशन (पिंपरी चिंचवड)कडील १ गुन्हा
इतर जिल्ह्यांमधील ५ गुन्हे
सध्या इतर २ मोटार सायकलींचा तपास सुरू असून, विधीसंघर्षीत बालक व त्याच्या साथीदारांकडून एकूण १४ चोरीच्या मोटार सायकली असा जवळपास १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे व पसार झालेल्या पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध सुरू आहे.
मार्गदर्शन व तपास पथक
सदरची यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर) श्री. राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ ०१, पुणे शहर) श्री. कृषीकेश रावले आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (विश्रामबाग विभाग, पुणे शहर) श्रीमती अनुजा देशमाने यांचे मार्गदर्शनखाली पार पडली. तसेच विश्रामबाग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. विकास भिंगारदिवे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. रमेश लाहिगुडे यांच्या सूचनांनुसार तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक उमेश कारके, पोलीस उप-निरीक्षक सत्यवान गेंड, पोलीस उप-निरीक्षक मेहबुब मोकाशी, आणि पोलीस अंमलदार नितीन मुंढे, अमोल भोसले, महेश कदम, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, शशीकांत दरेकर, कैलास डुकरे, जाकीर मणियार, अनिस शेख, शिवदत्त गायकवाड, सागर मोरे, अर्जुन थोरात, भास्कर गायकवाड व उमेश गव्हाणे यांनी ही कामगिरी केली आहे.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























