अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान नीचे लोहार समाजातील लोकांचे पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत मिळण्याबाबत निवेदन देण्यात आले
राहुरी प्रतिनिधी गणेश भालके
7058038395
अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी लोहार समाजातील समाजसेवकांनी केली. अनेक भागांमध्ये सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीची पंचनामे सुरू झाली आहेत तर काही ठिकाणी शेतकरी पंचनामे करूनही भरपाई न मिळाल्याने नाराज आहेत. नुकसानीची भरपाई वेळेत न मिळाल्यास रब्बीचे पेरणीवर परिणाम होईल अशी चिंता व्यक्त केली जात आहे. कृषी विभागाकडून सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत आणि सुमारे 24 जिल्ह्यांमध्ये 22 लाख हेक्टर हुन अधीक्षक जमिनीचे नुकसान झाल्याची माहिती आहे. त्याच कारणाने लोहार समाजामध्ये देखील बऱ्याच लोकांचे शेतीचे, घराची नुकसान झालेली आहे. त्यांना तातडीने पंचनामे करून मदत मिळावी यासाठी मदत व पुनर्वसन राज्यमंत्री साहेब यांच्या दालनात बैठक झाली त्यामध्ये लोहार समाजातील खूप लोकांचे नुकसान झाले आहे तरी त्यांना शासनाने मदत करावी अशी मागणी, दत्ताभाऊ कौसे , पत्रकार गणेश भालके, क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज चॅनल चे सहसंपादक तसेच लोहार समाजातील समाजसेवक शिवाजी दवणे, तसेच प्रभाकर लाड सर, व रामलिंग कांबळे साहेब यांनी निवेदन दिले आहे व लवकरात लवकर त्यांना मदत मिळावी यासाठी शासन दरबारी निवेदन देण्यात आले आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























