नगर मनमाड राज्य मार्गाने घेतला आणखी एका तरुणा चा बळी
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज संपादक शिवाजी दवणे 9730170965
राहुरी शहर हद्दीत नगर मनमाड राज्य महामार्गावर आज दि. १० ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत एका तीस वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची घटना उघडकीस आली. राज्य महामार्ग आणखी किती बळी घेणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.
असलम बशीर सय्यद हा ३१ वर्षीय विवाहित तरुण राहुरी शहरातील तनपूरेवाडी रोड, महाल टेकडी येथील रहिवाशी असून तो सध्या राहुरी फॅक्टरी येथे राहत होता. तो विद्यापीठ येथील एका फळ विक्रेत्याकडे चालक म्हणून काम करत होता. असलम सय्यद हा आज दि. १० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ८.१५ वाजे दरम्यान राहुरी फॅक्टरी येथुन विद्यापीठकडे त्याच्या वाहनावर जात होता. त्यावेळी राहुरी शहर हद्दीतील सुतगिरणी परिसरात असलेल्या साई शिवराम पेट्रोल पंपाजवळ त्याच्या वाहनाला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या धडकेत असलम सय्यद याच्या डोक्याला जबर मार लागून तो जागीच ठार झाला. रवींद्र देवगीरे यांनी त्याला रुग्णवाहिकेतून तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकारी प्रवीण शिरसागर यांनी त्याला तपासुन उपचारापूर्वीच मयत घोषित केले. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय नवले यांनी पंचनामा केल्या नंतर मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले. या प्रसंगी पत्रकार अयुब पठाण, इस्माईल सय्यद, रफिक शेख, रियाज देशमुख, सलिम शेख, अमजद पठाण, दिपक रकटे, इम्रान खान आदिसह अनेकजण उपस्थित होते.
असलम सय्यद याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे त्याच्या अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. नगर मनमाड राज्य महामार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्याचे अत्यंत धिम्या गतीने व निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे. ठिकठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक सुरु आहे. त्यामुळे सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























