Homeताज्या बातम्याआईच्या प्रियकराचा मुलीच्या प्रियकराकडून खून; काळेपडळ पोलिसांनी ४८ तासांत ६ आरोपींना ठोकल्या...

आईच्या प्रियकराचा मुलीच्या प्रियकराकडून खून; काळेपडळ पोलिसांनी ४८ तासांत ६ आरोपींना ठोकल्या बेड्या

पुणे: आईच्या प्रियकराचा, मुलीच्या प्रियकराने आपल्या साथीदारांच्या मदतीने डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना हडपसर परिसरातील ससाणेनगर येथे घडली होती. या गुन्ह्याचा छडा लावत काळेपडळ पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास करून मुख्य आरोपीसह एकूण ६ जणांना ४८ तासांच्या आत अटक केली आहे.
​घटनेची पार्श्वभूमी
​दिनांक ३ मे २०२६ रोजी ससाणेनगर, हडपसर येथील हिंगणे बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये ही घटना घडली. फिर्यादीचे पती गणेश संजू बिरादार (वय २५, रा. ससाणेनगर, हडपसर) यांचा आरोपींसोबत तीन महिन्यांपूर्वी वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून मुख्य आरोपी दुर्वांग उर्फ पारस सुनील मानकर आणि साहील सागर शेलार यांनी आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने गणेश बिरादार यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी गणेश यांच्या डोक्यात सिमेंटचे ब्लॉक मारून आणि लाथाबुक्क्यांनी गंभीर मारहाण करून त्यांची हत्या केली. याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. २०१/२०२६ नुसार भा.न्या.स कलम १०३, १०९, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
​तपास आणि अटक सत्र
​गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ३ तपास पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली होती. तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सुरुवातीला तीन आरोपींना ७ मे २०२५ रोजी अटक केली:
१. साहील सागर शेलार (वय २४, रा. ससाणेनगर, हडपसर)
२. चंद्रशेखर सोमनाथ जावीर (वय २०, रा. सुखसागर नगर, कात्रज)
३. सुरज रमेश दोरकर (वय २१, रा. गाडीतळ, हडपसर)
​या अटकेतील आरोपींच्या चौकशीतून आणि तांत्रिक तपासातून मुख्य आरोपी दुर्वांग उर्फ पारस सुनील मानकर (वय २१, रा. शुक्रवार पेठ, स्वारगेट) हा खेड शिवापूर ते कात्रज परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याच्या खालील दोन साथीदारांना देखील ताब्यात घेतले:
४. दुर्वांग उर्फ पारस सुनील मानकर (मुख्य आरोपी)
५. पारस किशोर गायकवाड (वय २१, रा. दत्तवाडी, सिंहगड रोड)
६. अभि उर्फ अभिजीत संजय इंगळे (वय २२, रा. दत्तवाडी, पुणे)
​तपास पथकाची कामगिरी
​सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ ५) सागर कवडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अतुलकुमार नवगिरे, आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
​या तपास पथकात पोलीस निरीक्षक (गुन्हे) आण्णासो बाबर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे, अजय हंचाटे (तपास अधिकारी) आणि पोलीस अंमलदार प्रविण काळभोर, निलेश देसाई, दाऊद सय्यद, प्रतीक लाहिगुडे, अमोल फडतरे, परशुराम पिसे, राजू वाघमारे, शाहिद शेख, बालू ठाकूर, अतुल पंधरकर, महादेव शिंदे, प्रदीप बेडीस्कर, गिरिराज जगदाळे, विशाल ठोंबरे, सद्दाम ताबोळी, राकेश साळुंखे आणि नितीन ढोले यांचा समावेश होता.
​या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय हंचाटे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे पोलीस दलाची कौतुकास्पद कामगिरी: अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीविरुद्ध अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र...

पुणे: हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमाविरुद्ध पुणे पोलिसांनी अत्यंत जलदगतीने कारवाई केली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या २४ तासांच्या आत...

​पुणे पोलिसांची मोठी कारवाई: खुनाचा कट रचणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तिघे अटकेत

पुणे: पूर्ववैमनस्यातून खुनाचा कट रचणाऱ्या एका टोळीला पुणे शहर गुन्हे शाखा युनिट ७ च्या पथकाने शस्त्रांसह अटक केली आहे. वेळेत कारवाई केल्यामुळे पोलिसांनी एक...

IMD ने महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला; गरम दिवस आणि उकाड्याच्या रात्री पुणे |...

पुणे: भारतीय हवामान विभागाने (IMD) मंगळवारी महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला असून, येत्या काही दिवसांत सतत उच्च तापमान आणि रात्रीच्या वेळी...

बलात्कार, फसवणूक आणि ‘धन्य वस्तू’: नाशिकच्या ज्योतिषी ‘भोंदू बाबा’वर ईडीने पकड घट्ट केली, राष्ट्रवादीच्या...

‘भोंदू बाबा’ अशोक खरात प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना ईडीने समन्स बजावले आहे नवी दिल्ली: स्वयंघोषित गॉडमन अशोक खरात याला 'भोंदू बाबा'...

विश्रांतवाडी परिसरातील दोन झाडे विनाकारण कापण्यात आल्याचा आरोप करत पुणे पँथर सेनेचे अध्यक्ष सचिन...

विश्रांतवाडी परिसरातील वृक्षतोडीविरोधात संताप पुणे | विश्रांतवाडी – टिंगरे नगर रोड विश्रांतवाडी परिसरातील दोन झाडे विनाकारण कापण्यात आल्याचा आरोप करत पुणे पँथर सेनेचे अध्यक्ष सचिन...

error: Content is protected !!