उच्चभ्रू कल्याणीनगरमध्ये स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; २ महिलांची सुटका, एकाला अटक
पुणे शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कल्याणीनगर परिसरात मसाज सेंटरच्या आडून सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर येरवडा पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन पीडित महिलांची सुटका केली असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अंजुम बागवान यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, कल्याणीनगर येथील ‘निरा स्पा सेंटर’मध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून तपास केला. माहिती खरी असल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी तत्काळ छापा टाकला.
या धाडीत आरोपी अरमान रहिमउद्दीन हसेन (वय २१, रा. विमाननगर, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले. तसेच त्याच्याकडून वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करण्यात आलेल्या दोन महिलांची सुटका करण्यात आली.
या प्रकरणी दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर २०१/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम १४३(९)(३), ३(५) तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम ३, ४, ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. विजय ठाकर करत आहेत.
ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) श्री. मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ ०४ श्री. चिलुमूला रजनिकांत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग श्री. सुनिल जैतापरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अंजुम बागवान व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. विजय ठाकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेशकुमार पाटील, उपनिरीक्षक महेश फटांगरे, शुभांगी चव्हाण तसेच पोलीस अंमलदारांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
या कारवाईमुळे कल्याणीनगरसारख्या उच्चभ्रू भागात सुरू असलेल्या अशा बेकायदेशीर व्यवसायांवर पोलिसांचा वचक बसला असून, अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























