पुणे (प्रतिनिधी):
सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेली ‘कॉकरोच जनता पार्टी’ (Cockroach Janta Party – CJP) ही तरुणांच्या भावना, बेरोजगारीविरोधातील संताप आणि
व्यवस्थेविरोधातील आवाज व्यक्त करणारी एक अनोखी डिजिटल चळवळ ठरत आहे. या आंदोलनाला देशभरातील तरुणांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, सोशल मीडियावर लाखो लोक या मोहिमेशी जोडले गेले आहेत. अशातच आता पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते आणि पुणे पॅंथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन भोसले यांनी या डिजिटल चळवळीसोबत भविष्यात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
या संदर्भात आपली भूमिका मांडताना सचिन भोसले म्हणाले की, “कॉकरोच जनता पार्टी हा आजच्या तरुणांचा एक मोठा डिजिटल प्लॅटफॉर्म बनत चालला आहे. माझ्यासारख्या अनेक तरुण सामाजिक कार्यकर्त्यांना या माध्यमातून आपले विचार मांडण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे भविष्यात या प्लॅटफॉर्मसोबत काम करण्याची माझी तीव्र इच्छा आहे.”
विनोदी आणि उपरोधिक शैलीत गंभीर प्रश्न!
पुढे बोलताना त्यांनी व्यवस्थेवर बोट ठेवले. “देशातील वाढती बेरोजगारी, पेपरफुटी, तरुणांमधील असंतोष आणि व्यवस्थेविरोधातील भावना या आंदोलनातून समोर येत आहेत. विनोदी आणि उपरोधिक शैलीत गंभीर प्रश्न मांडण्याची त्यांची पद्धत अनेक तरुणांना मनापासून भावत आहे,” असे भोसले यांनी नमूद केले.
पक्ष नसून एक विचार!
सचिन भोसले यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या विचारसरणीचे कौतुक करत सांगितले की, “ही चळवळ म्हणजे फक्त एक पक्ष नसून तो एक विचार आहे. समाजातील वंचित, बेरोजगार आणि सामान्य तरुणांच्या प्रश्नांवर आवाज उठवणे आज अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. कॉकरोच जनता पार्टीचे ‘सेक्युलर, सोशलिस्ट, डेमोक्रॅटिक’ हे विचार आणि तरुणांना एकत्र जोडण्याची त्यांची पद्धत मला विशेष आवडली आहे.”
पुणे पॅंथर सेनेच्या या भूमिकेमुळे आता पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते सचिन भोसले हे आगामी काळात ‘कॉकरोच जनता पार्टी’ सोबत प्रत्यक्ष मैदानात काम करणार का? याबाबत सोशल मीडियासह राजकीय व सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























