Homeताज्या बातम्या​‘कॉकरोच जनता पार्टी’सोबत भविष्यात काम करण्याची इच्छा; पुणे पॅंथर सेनेचे अध्यक्ष सचिन...

​‘कॉकरोच जनता पार्टी’सोबत भविष्यात काम करण्याची इच्छा; पुणे पॅंथर सेनेचे अध्यक्ष सचिन भोसले यांचे मोठे विधान

पुणे (प्रतिनिधी):
सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेली ‘कॉकरोच जनता पार्टी’ (Cockroach Janta Party – CJP) ही तरुणांच्या भावना, बेरोजगारीविरोधातील संताप आणि व्यवस्थेविरोधातील आवाज व्यक्त करणारी एक अनोखी डिजिटल चळवळ ठरत आहे. या आंदोलनाला देशभरातील तरुणांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, सोशल मीडियावर लाखो लोक या मोहिमेशी जोडले गेले आहेत. अशातच आता पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते आणि पुणे पॅंथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन भोसले यांनी या डिजिटल चळवळीसोबत भविष्यात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
​या संदर्भात आपली भूमिका मांडताना सचिन भोसले म्हणाले की, “कॉकरोच जनता पार्टी हा आजच्या तरुणांचा एक मोठा डिजिटल प्लॅटफॉर्म बनत चालला आहे. माझ्यासारख्या अनेक तरुण सामाजिक कार्यकर्त्यांना या माध्यमातून आपले विचार मांडण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे भविष्यात या प्लॅटफॉर्मसोबत काम करण्याची माझी तीव्र इच्छा आहे.”
​विनोदी आणि उपरोधिक शैलीत गंभीर प्रश्न!
​पुढे बोलताना त्यांनी व्यवस्थेवर बोट ठेवले. “देशातील वाढती बेरोजगारी, पेपरफुटी, तरुणांमधील असंतोष आणि व्यवस्थेविरोधातील भावना या आंदोलनातून समोर येत आहेत. विनोदी आणि उपरोधिक शैलीत गंभीर प्रश्न मांडण्याची त्यांची पद्धत अनेक तरुणांना मनापासून भावत आहे,” असे भोसले यांनी नमूद केले.
​पक्ष नसून एक विचार!
​सचिन भोसले यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या विचारसरणीचे कौतुक करत सांगितले की, “ही चळवळ म्हणजे फक्त एक पक्ष नसून तो एक विचार आहे. समाजातील वंचित, बेरोजगार आणि सामान्य तरुणांच्या प्रश्नांवर आवाज उठवणे आज अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. कॉकरोच जनता पार्टीचे ‘सेक्युलर, सोशलिस्ट, डेमोक्रॅटिक’ हे विचार आणि तरुणांना एकत्र जोडण्याची त्यांची पद्धत मला विशेष आवडली आहे.”
​पुणे पॅंथर सेनेच्या या भूमिकेमुळे आता पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते सचिन भोसले हे आगामी काळात ‘कॉकरोच जनता पार्टी’ सोबत प्रत्यक्ष मैदानात काम करणार का? याबाबत सोशल मीडियासह राजकीय व सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

युनिट-३ गुन्हे शाखा, पुणे शहरची मोठी कारवाई: गावठी पिस्टल व काडतुसांसह दोन सराईत आरोपी...

पुणे, दिनांक २२ सप्टेंबर २०२६: पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-३ ने गस्तीदरम्यान मोठी कारवाई करत अवैधरित्या बाळगलेले गावठी पिस्टल, जिवंत काडतुसे आणि दुचाकीसह दोन जणांना...

गणेशोत्सवात दहशत माजविणाऱ्या धारधार कोयता बाळगणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखेच्या युनिट-१ कडून जेरबंद

पुणे: पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने गणेशोत्सवामध्ये लोखंडी हत्यार घेऊन दहशत माजविणाऱ्या एका आरोपीस ताब्यात घेतले आहे. ही कारवाई हुजुरपागा शाळेसमोर, सार्वजनिक रोडवर,...

गणेशोत्सवात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची येरवडा पोलीस ठाण्याला भेट | नागरिकांशी मनमोकळा संवाद

गणेशोत्सवात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची येरवडा पोलीस ठाण्याला सदिच्छा भेट; रात्री ११ वाजता नागरिकांशी साधला मनमोकळा संवाद पुणे, दि. १९ सप्टेंबर २०२६ : गणेशोत्सवाच्या...

पुणे पोलिसांच्या ‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत मोठी कारवाई; चंदननगर हद्दीतून २ गावठी पिस्टल व जिवंत...

​पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपायुक्त, परिमंडळ-७ यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या 'मिशन क्रॅकडाऊन' मोहिमेत पोलिसांना मोठे यश आले आहे. चंदननगर पोलीस...

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या तब्बल २६ जणांवर मुंढवा पोलिसांची कायदेशीर कारवाई

पुणे: पुण्यातील मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या एकूण २६ जणांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. ​सप्टेंबर महिन्यामध्ये सोशल मीडियावरील ‘इन्स्टाग्राम’ (Instagram) माध्यमातून मुंढवा...

error: Content is protected !!