Homeताज्या बातम्यागद्दार खासदारांविरोधात शिवसेना पुणे आक्रमक; रस्ता पेठेत तिरडी आंदोलनाने परिसर दणाणला

गद्दार खासदारांविरोधात शिवसेना पुणे आक्रमक; रस्ता पेठेत तिरडी आंदोलनाने परिसर दणाणला

पुणे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मशाल चिन्हावर निवडून आलेल्या सहा फुटीर खासदारांनी जनादेशाशी आणि शिवसैनिकांच्या भावनांशी केलेल्या विश्वासघाताच्या निषेधार्थ शिवसेना पुणे शहराच्या कंटोनमेंट विभागाच्या वतीने रस्ता पेठ येथील पॉवर हाऊस चौकात तीव्र व आक्रमक आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनादरम्यान गद्दार खासदारांच्या राजकीय मयतीचे प्रतीक म्हणून तिरडी आणण्यात आली होती. मात्र पोलिस प्रशासनाने तिरडी ताब्यात घेतल्याने शिवसैनिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला. आंदोलनस्थळी घोषणाबाजीने वातावरण तापले होते.
“तिरडीला सुरक्षा देणाऱ्या सरकारचे करायचे काय? खाली डोके वर पाय!” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. शिवसैनिकांनी जनादेशाशी गद्दारी करणाऱ्या खासदारांविरोधात तीव्र रोष व्यक्त करत आगामी काळात आणखी तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला.
सदर आंदोलनाचे आयोजन विभागप्रमुख उत्तम भुजबळ यांनी केले होते.
यावेळी सहसंपर्क प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, शहरप्रमुख वसंत मोरे, गटनेते नितीन गावडे, माजी शहरप्रमुख रामभाऊ पारिख, महिला आघाडीच्या पद्मा सोरटे, कविता सोनवणे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, आबा निकम, प्रशांत राणे, चंदन साळुंके, युवासेना शहर संघटक युवराज पारिख, वैभव दिघे, परेश खांडके, प्रतीक आल्हाट, दिलीप पोमण, विजय नायर, नितीन निगडे, गणेश लडकत, जगदीश दिघे, अजय भुवड, वीरेंद्र गायकवाड, नागनाथ शिंदे, नरेंद्र दरोडे, मारुती ननवरे, रमेश परदेशी, परवेश राव, मोहन दुधाणे, भरत शेडगे, संजय वाल्हेकर, मुरली विणकर, सुनील राजगोंडा, नितीन दलभंजन, बाबा परदेशी, आबा मोडक, शरद गुप्ते, सोनू पाटील, राहुल चिंदम, सचिन पगरिया, गोरख चव्हाण, अनिल परदेशी, सचिन चिंचवडे, दिलीप व्यवहारे, सोहम जाधव, चिंतामण मुंगी, पवन कांचन, नीरज नांगरे, अनिल जाधव, निहाल सोरटे, योगेश पवार, नितीन जगताप, हेमंत जोशी, आपा शेलार, दत्ता पवार, शुभम पवार, सुनील हळंदे, वीरेश अडगळे, नागेश खडके, दत्ता घुले, गौरव सिन्नरकर, बाळासाहेब पायगुडे, प्रवीण रणदिवे, मकरंद पेटकर, शरद चौधरी, आनंद बेंद्रे, राहुल शेडगे, संजय लाहोट, सूरज मोराळे, मिलिंद पत्की, राहुल बायस, श्रीनिवास कराड, शाम चिखले, चंद्रकांत इंदुलकर, नंदू जांभळे, काका लडकत, रोहित लगाडे, मनीष जाधव, सुनील गायकवाड, शुभम शिंदे यांच्यासह असंख्य शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी एकमुखाने सांगितले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता कधीही माफ करणार नाही. जनादेशाचा अपमान करणाऱ्या फुटीर खासदारांविरोधात शिवसेनेचा संघर्ष अधिक तीव्र करण्यात येईल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्य माहिती आयोगाच्या पुणे खंडपीठात पारदर्शकता व सन्मानासाठी ‘खुर्ची सोडा’ आंदोलन यशस्वी; विविध संघटनांचा...

राज्य माहिती आयोगाच्या पुणे खंडपीठात पारदर्शकता व सन्मानासाठी ‘खुर्ची सोडा’ आंदोलन यशस्वी; विविध संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग ​पुणे, दि. १ सप्टेंबर २०२६: माहितीचा अधिकार अधिक प्रभावीपणे...

कोंढवा पोलीस ठाण्याची धडाकेबाज कारवाई: अवघ्या ४८ तासांत दोन गुन्हे दाखल, ८ लाखांहून अधिकचे...

पुणे: कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत पोलिसांनी अत्यंत कठोर पावले उचलत अवघ्या ४८ तासांत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या धडाकेबाज...

मांजरम बस स्टॉप परिसरात अखेर गतिरोधकाचे काम सुरू; ग्रामस्थांच्या मागणीला यश

नांदेड | दि. १ सप्टेंबर २०२६ : मांजरम बस स्टॉप परिसरातील नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या गतिरोधक बसविण्याच्या...

बाजारपेठेत गर्दीचा फायदा घेऊन मंगळसूत्र व रोख रक्कम चोऱ्या करणाऱ्या मध्य प्रदेशातील ६ महिलांच्या...

पुणे शहरातील बाजारपेठेत गर्दीचा गैरफायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रे व रोख रक्कम चोरी करणाऱ्या मध्य प्रदेश येथील ६ महिलांच्या आंतरराज्यीय टोळीला लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनच्या...

पुणे: अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई; मेफेड्रॉन विक्री करणाऱ्या तस्करांकडून ४ लाख ४०...

पुणे शहरात अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या तस्करांवर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने मोठी कारवाई केली आहे. मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थाचा...

error: Content is protected !!