Homeक्राईमग्राइंडर सोशल नेटवर्कीग ऑप्लीकेशनचा वापर करुन जबरी चोरी करणा-या दोघां विरुध्द मुंढवा...

ग्राइंडर सोशल नेटवर्कीग ऑप्लीकेशनचा वापर करुन जबरी चोरी करणा-या दोघां विरुध्द मुंढवा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल व दोन्ही आरोपीतांना २४ तासाच्या आत अटक

पुणे:  ग्राइंडर सोशल नेटवर्कीग अॅप्लीकेशनचा वापर करुन जबरी चोरी करणा-या दोघां विरुध्द मुंढवा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल व दोन्ही आरोपीतांना २४ तासाच्या आत अटक

दिनांक २३/०१/२०२५ रोजी गुन्ह्यातील फिर्यादी यांची ग्राइंडर सोशल नेटवर्कीग नावाचे अॅप्लीकेशनवर इसम नामे बापु याचेबरोबर ओळख झाली होती. त्याने फिर्यादी यांना तुला भेटायचे आहे असे सांगुन मारुती सुझुकी शोरुम मगरपट्टा येथे बोलावुन घेतले.फिर्यादी सदर ठिकाणी आल्यानंतर बापु नावाचे इसमाने भेटण्याचा बहाणा करुन फिर्यादीचे दुचाकीवर बसुन लक्ष्मी लॉन्सचे समोर हडपसर रेल्वे स्टेशन जवळ, मुंढवा पुणे येथील मोकळ्या जागेत घेवुन गेला. त्याठिकाणी बापु याचा एक साथीदार अगोदरच येवुन थांबलेला होता. त्या दोघांनी मिळून फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी देवुन, फिर्यादीचे गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेवुन त्या दोघांनी अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले. सदर बाबत फिर्यादी यांनी तक्रार दिल्याने बापु व त्याचा अनोळखी साथीदार यांच्या विरुध्द मुंढवा पो ठाणे येथे बी.एन.एस. कलम ३०९ (४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्यातील आरोपी बापु बाबत पोलीस हवा. विनोद साळुंके यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे त्यांनी (१) करण उर्फ कॅरी (बापू) विशाल लाचारकर, वय २३ वर्षे, रा.१३ ताडीवाला रोड, इंद्रा मित्र मंडळा समोर, पुणे यास ताब्यात घेवुन त्याच्याकडे तपास केला असता त्याने त्याचा साथीदार नामे मनिष बबन निंबाळकर, वय २१ वर्ष, रा. गोपाळपट्टी, मांजरी का हडपसर पुणे मुळ गाव राळेगण म्हसोबा, ता.जि. आहिल्यानगर याच्यासह सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने दोन्ही आरोपीतांना सदर गुन्ह्यात २४ तासाच्या आत अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक राजु महानोर हे करीत आहेत.

सदरची उल्लेखनिय कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त सो, पुर्व प्रादेशिक विभाग, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त सो, परि०५, श्री. डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त सो, हडपसर विभाग, श्रीमती अनुराधा उदमले, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो, मुंढवा पो ठाणे श्री. निळकंठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली श्री राजु महानोर, सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार विनोद साळुंके, शिवाजी जाधव, योगेश गायकवाड, राहुल धोत्रे, राजु कदम, अक्षय धुमाळ, स्वप्निल रासकर, योगेश राउत यांच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सर्वसमावेशक भटक्या कुत्र्यांच्या धोरणासाठी महापालिकेचे महापौर प्राणीप्रेमींची बैठक घेणार आहेत. पुणे बातम्या

पुणे : शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या रोखण्यासाठी सर्वसमावेशक धोरण आखण्यासाठी महापालिका लवकरच प्राणीप्रेमी आणि स्वयंसेवी संस्थांसोबत बैठक घेणार असल्याचे पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे...

GRAS पोर्टलच्या त्रुटीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात मालमत्ता नोंदणीला फटका; दुपारनंतर सेवा पूर्ववत | पुणे बातम्या

पुणे: मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क भरण्यासाठी अनिवार्य व्यासपीठ असलेल्या गव्हर्नमेंट रिसिप्ट अकाउंटिंग सिस्टीम (GRAS) पोर्टलला - मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे शुक्रवारी संपूर्ण महाराष्ट्रातील मालमत्तेची...

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षे सक्त मजुरी

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षे सक्त मजुरी पुणे (शशिकांत पाटोळे) | दि; ७ मार्च २०२६ : हडपसर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी...

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त “सुराज्य रोजा इफ्तार पार्टी” चे आयोजन करण्यात आले.

पुणे : शिवजयंतीनिमित्त रोजा इफ्तार पार्टीत हिंदू–मुस्लिम ऐक्याचा संदेश पुणे शहरातील मंगलवार पेठ परिसरातील मदीना कॉम्प्लेक्स (मकान नं. 416) येथे शुक्रवार दिनांक 6 मार्च 2026...

10 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला 20 वर्षांची शिक्षा. पुणे बातम्या

पुणे: शहरातील एका विशेष पोक्सो न्यायालयाने 40 वर्षीय व्यक्तीला 10 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आणि तिच्या व तिच्या पाच वर्षांच्या मित्राला ऑगस्ट 2020...

error: Content is protected !!