पुणे: ग्राइंडर सोशल नेटवर्कीग अॅप्लीकेशनचा वापर करुन जबरी चोरी करणा-या दोघां विरुध्द मुंढवा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल व दोन्ही आरोपीतांना २४ तासाच्या आत अटक
दिनांक २३/०१/२०२५ रोजी गुन्ह्यातील फिर्यादी यांची ग्राइंडर सोशल नेटवर्कीग नावाचे अॅप्लीकेशनवर इसम नामे बापु याचेबरोबर ओळख झाली होती. त्याने फिर्यादी यांना तुला भेटायचे आहे असे सांगुन मारुती सुझुकी शोरुम मगरपट्टा येथे बोलावुन घेतले.फिर्यादी सदर ठिकाणी आल्यानंतर बापु नावाचे इसमाने भेटण्याचा बहाणा करुन फिर्यादीचे दुचाकीवर बसुन लक्ष्मी लॉन्सचे समोर हडपसर रेल्वे स्टेशन जवळ, मुंढवा पुणे येथील मोकळ्या जागेत घेवुन गेला. त्याठिकाणी बापु याचा एक साथीदार अगोदरच येवुन थांबलेला होता. त्या दोघांनी मिळून फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी देवुन, फिर्यादीचे गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेवुन त्या दोघांनी अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले. सदर बाबत फिर्यादी यांनी तक्रार दिल्याने बापु व त्याचा अनोळखी साथीदार यांच्या विरुध्द मुंढवा पो ठाणे येथे बी.एन.एस. कलम ३०९ (४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्यातील आरोपी बापु बाबत पोलीस हवा. विनोद साळुंके यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे त्यांनी (१) करण उर्फ कॅरी (बापू) विशाल लाचारकर, वय २३ वर्षे, रा.१३ ताडीवाला रोड, इंद्रा मित्र मंडळा समोर, पुणे यास ताब्यात घेवुन त्याच्याकडे तपास केला असता त्याने त्याचा साथीदार नामे मनिष बबन निंबाळकर, वय २१ वर्ष, रा. गोपाळपट्टी, मांजरी का हडपसर पुणे मुळ गाव राळेगण म्हसोबा, ता.जि. आहिल्यानगर याच्यासह सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने दोन्ही आरोपीतांना सदर गुन्ह्यात २४ तासाच्या आत अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक राजु महानोर हे करीत आहेत.
सदरची उल्लेखनिय कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त सो, पुर्व प्रादेशिक विभाग, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त सो, परि०५, श्री. डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त सो, हडपसर विभाग, श्रीमती अनुराधा उदमले, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो, मुंढवा पो ठाणे श्री. निळकंठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली श्री राजु महानोर, सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार विनोद साळुंके, शिवाजी जाधव, योगेश गायकवाड, राहुल धोत्रे, राजु कदम, अक्षय धुमाळ, स्वप्निल रासकर, योगेश राउत यांच्या पथकाने केली.

सूचना / Disclaimer:
या पोर्टलवरील सर्व बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि मजकूर हे केवळ माहिती व जनहितासाठी प्रसारित केले जातात. आमचा उद्देश कुणाच्याही भावना दुखावणे किंवा अफवा पसरवणे हा नाही. कोणतीही माहिती प्रसारित करण्यापूर्वी आम्ही ती सत्य व खात्रीशीर असल्याची पुष्टी करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.