चार वर्षापासुन चार गुन्हयात फरार असलेल्या आरोपीस जेरबंद करून जबरी चोरीचा गुन्हा आणला उघडकीस स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणची कारवाई
पुणे-::वालचंदनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. २६/२०२४ भा.न्या.सं. ३९४ प्रमाणे दि. १७/०१/२०२४ रोजी दाखल असून सदर गुन्हयातील फिर्यादी नामे दिपक पोपट रासकर वय ३२ वर्षे रा.निरवांगी ता. इंदापूर जि.पुणे हे त्यांचे आईसह राहते घरात झोपलेले असताना दि. १७/०१/२०२४ रोजी पहाटेच्या वेळी अनोळखी दोन इसमांनी घरात घुसून चोरी करत असताना फिर्यादीस जाग आल्याने चोरट्यांना विरोध केल्यामुळे फिर्यादीस चाकूने मारहाण करून जबरी चोरी केली आहे. त्याबाबत फिर्यादीने वरील प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे.
सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख, साो. पुणे ग्रामीण यांनी स्था.गु.शा.चे पथकास योग्य ते मार्गदर्शन करून सुचना केल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी पथकास सुचना करून सीसीटीव्ही फुटेज, आसपासचे परिसरात साक्षीदारांकडे तपास करणेबाबत सुचना केल्या होत्या. त्याप्रमाणे स्था.गु.शा.चे पथकाने घटनास्थळा पासून जाणारे येणारे रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, काही संशयित इसम निदर्शनास आले होते. सदर फुटेज मधील इसमांचे वर्णन व गुन्हा करणेसाठी आलेले आरोपोंचे वर्णनात साम्य होते, त्याअनुषंगाने पथकाने प्राप्त फुटेज हे गोपनीय बातमीदारांना दाखविले असता, संशयित इसम हा रेकॉर्डवरील आरोपी नामे शिवा मिठु भोसले रा. पिटकेश्वर इंदापूर हा असून त्यानेच त्याचे इतर साथीदारांसोबत गुन्हा केला असल्याची माहिती पथकास मिळाली. त्या माहितीचे आधारे निष्पन्न आरोपी शिवा भोसले याचा स्था.गु.शा. चे पथकाने वारंवार जावून शोध घेतला असता, तो वेळोवेळी गुंगारा देत होता.
स्था.गु.शा.चे पथक दि. १५/०२/२०२५ रोजी वालचंदनगर पो स्टे हद्दीत गुन्हे प्रकटीकरणाचे अनुषंगाने हजर असताना पोहवा स्वप्निल अहीवळे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, संशयित आरोपी शिवा भोसले आहे सराफवाडील चौकात आलेला आहे, अशी बातमी मिळाल्याने पथकाने सापळा रचून आरोपी नामे शिवा मिठु भोसले वय ४५ वर्षे रा. पिटकेश्वर, भोंगवस्ती, ता. इंदापूर जि. पुणे यास ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवून चौकशी केली असता, त्याने वरील नमुद गुन्हा केला असल्याचे सांगितले असून त्याचे सोबत गुन्हा करते वेळी त्याचे सोबत इतर साथीदार असल्याचे सांगितले.
(१) वालचंदनगर पो स्टे गु.र.नं. ६१२/२०२३ भादंवि ४५७,३८०, (२) इंदापूर पो स्टे गु.र.नं ७६/२०२२ भादंविक. ३२५, (३) इंदापूर पोस्टे गु.र.नं.५०३/२०२३ भादंवि क. ४५४,४५७,३८०, (४) इंदापूर पो स्टे गु.र.नं ८८१/२०२३ भादंविक, ४५४,४५७,३८० प्रमाणे दाखल गुन्हयात आरोपी शिवा मिठु भोसले वय ४५ वर्षे रा. पिटकेश्वर, भोंगवस्ती, ता. इंदापूर जि. पुणे हा पाहिजे आरोपी असून तो पुणे ग्रामीण जिल्हयाचे अभिलेखावर पाहिजे आरोपी आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख, साो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार बारामती विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुदर्शन राठोड, बारामती विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, वालचंदनगर पो स्टे चे सपोनि राजकुमार डुणगे, स्था.गु.शाचे सपोनि कुलदीप संकपाळ, स्था.गु.शा. चे अंमलदार बाळासाहेब कारंडे, ज्ञानदेव क्षिरसागर, स्वप्निल अहीवळे, अभिजीत एकशिंगे, अतुल डेरे, यांनी केली आहे.
पुणे

सूचना / Disclaimer:
या पोर्टलवरील सर्व बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि मजकूर हे केवळ माहिती व जनहितासाठी प्रसारित केले जातात. आमचा उद्देश कुणाच्याही भावना दुखावणे किंवा अफवा पसरवणे हा नाही. कोणतीही माहिती प्रसारित करण्यापूर्वी आम्ही ती सत्य व खात्रीशीर असल्याची पुष्टी करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.