चिमणा-चिमणी उद्यान प्रकरणात गोंधळ – उद्यान बंद ठेवण्याचा आदेश न्यायालयाचा की प्रशासकीय?
पुणे, सहकार नगर – चिमणा-चिमणी उद्यान (सहकार नगर) हे नागरिकांसाठी बंद ठेवण्याबाबत सध्या गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. उद्यान बंद ठेवण्यामागे मुंबई उच्च न्यायालयातील रिट पिटीशन क्र. ८७२०/२०१० हे कारण म्हणून दिले जात आहे, परंतु प्रत्यक्षात हा आदेश न्यायालयाचा आहे की मुख्य उद्यान अधिकाऱ्याचा – याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
हडपसर येथील सामाजिक कार्यकर्ते आमिर मोहम्मद शेख (मो. 7744808833) यांनी याबाबत महापालिकेकडे तक्रार दाखल केली असून त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की –
> “जर न्यायालयात प्रकरण प्रलंबित असेल, तर नागरिकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा स्पष्ट आदेश कुठे आहे? तसेच जर केवळ मुख्य उद्यान अधीक्षकांच्या सूचनेवर उद्यान बंद ठेवले जात असेल, तर त्याची कायदेशीरता काय?”
त्याचवेळी सकाळ-संध्याकाळ सुरू असणारे सार्वजनिक गार्डन मात्र खुल्या ठेवण्यात येत आहेत, हीही एक विसंगती असल्याचे शेख यांनी नमूद केले आहे.
शेख यांनी आपल्या तक्रारीत खालील मुद्दे उपस्थित केले आहेत:
उद्यान बंद ठेवण्यामागचा स्पष्ट आदेश लेखी स्वरूपात नागरिकांसमोर सादर करण्यात यावा.
हा आदेश न्यायालयाचा असेल तर त्याची प्रत प्रसिद्ध केली जावी.
जर मुख्य उद्यान अधिकाऱ्याचा निर्णय असेल, तर त्यांनी न्यायालयीन आदेशाचा आधार न देता स्वतःचा निर्णय का घेतला?
उद्यान पुन्हा नागरिकांसाठी खुले करण्याबाबत महापालिकेने वेळमर्यादा जाहीर करावी.
यासोबतच त्यांनी महापालिकेकडे मागणी केली आहे की, उद्यान वापराबाबत कोणतीही बाब पारदर्शक पद्धतीने जाहीर करण्यात यावी आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून नियमबाह्य निर्णय होत असल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी.

सूचना / Disclaimer:
या पोर्टलवरील सर्व बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि मजकूर हे केवळ माहिती व जनहितासाठी प्रसारित केले जातात. आमचा उद्देश कुणाच्याही भावना दुखावणे किंवा अफवा पसरवणे हा नाही. कोणतीही माहिती प्रसारित करण्यापूर्वी आम्ही ती सत्य व खात्रीशीर असल्याची पुष्टी करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.