जोतिबा डोंगर परिसरातील जंगल पुन्हा ‘दख्खन केदारण्य’ या नावाने निर्माण करण्याचा संकल्प!
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते जोतिबा डोंगर (कोल्हापूर) येथे राष्ट्रीय महामार्ग, वनविभाग, जिल्हा प्रशासन व पश्चिम देवस्थान समिती कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 10,000 वृक्षारोपण कार्यक्रम, ‘दख्खन केदारण्य’ची निर्मिती व श्री ज्योतिर्लिंग क्षेत्र बहुआयामी उत्कर्ष प्राधिकरणाचा (ऑनलाईन) शुभारंभ पार पडला. यावेळी जोतिबा डोंगर परिसरातील जंगल पुन्हा ‘दख्खन केदारण्य’ या नावाने निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी उपस्थितांना जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘दख्खन केदारण्य’ ही संकल्पना अत्यंत कौतुकास्पद असून, तिचा प्रारंभ जागतिक पर्यावरण दिनी होत असल्याचा आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, ‘जोतिबा मंदिर व परिसर विकास’ आराखड्यातून विविध विकास कामे व पर्यावरणपूरक प्रकल्प उभे राहत आहेत. या कामांसाठी जिथे आवश्यकता असेल, तेथे शासन पूर्णपणे सोबत राहील.
मुख्यमंत्री यांनी या मोहिमेचा उद्देश स्पष्ट करत सांगितले की, चार हजार वर्षांपूर्वी असलेले जोतिबा डोंगर परिसरातील जंगल पुन्हा “दख्खन केदारण्य” या नावाने पुनर्निर्मित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात श्रद्धाळू भेट देतात, त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी आणि निसर्ग संवर्धनासाठी हे उपक्रम महत्त्वाचे आहेत.
जोतिबा मंदिर व परिसर विकास आराखड्याचा प्रमुख भाग म्हणजे जोतिबा डोंगर हिरवागार करणे. श्रीक्षेत्र ज्योतिर्लिंग देवस्थान येथे मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी उत्तम सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि डोंगर परिसरातील वातावरणही उल्हासित राहावे, यासाठी विकास आराखड्यातून कामे होतील, अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमस्थळी आमदार डॉ. विनय कोरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

सूचना / Disclaimer:
या पोर्टलवरील सर्व बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि मजकूर हे केवळ माहिती व जनहितासाठी प्रसारित केले जातात. आमचा उद्देश कुणाच्याही भावना दुखावणे किंवा अफवा पसरवणे हा नाही. कोणतीही माहिती प्रसारित करण्यापूर्वी आम्ही ती सत्य व खात्रीशीर असल्याची पुष्टी करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.