Homeताज्या बातम्याजोतिबा डोंगर परिसरातील जंगल पुन्हा ‘दख्खन केदारण्य’ या नावाने निर्माण करण्याचा संकल्प!

जोतिबा डोंगर परिसरातील जंगल पुन्हा ‘दख्खन केदारण्य’ या नावाने निर्माण करण्याचा संकल्प!

जोतिबा डोंगर परिसरातील जंगल पुन्हा ‘दख्खन केदारण्य’ या नावाने निर्माण करण्याचा संकल्प!

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते जोतिबा डोंगर (कोल्हापूर) येथे राष्ट्रीय महामार्ग, वनविभाग, जिल्हा प्रशासन व पश्चिम देवस्थान समिती कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 10,000 वृक्षारोपण कार्यक्रम, ‘दख्खन केदारण्य’ची निर्मिती व श्री ज्योतिर्लिंग क्षेत्र बहुआयामी उत्कर्ष प्राधिकरणाचा (ऑनलाईन) शुभारंभ पार पडला. यावेळी जोतिबा डोंगर परिसरातील जंगल पुन्हा ‘दख्खन केदारण्य’ या नावाने निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी उपस्थितांना जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘दख्खन केदारण्य’ ही संकल्पना अत्यंत कौतुकास्पद असून, तिचा प्रारंभ जागतिक पर्यावरण दिनी होत असल्याचा आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, ‘जोतिबा मंदिर व परिसर विकास’ आराखड्यातून विविध विकास कामे व पर्यावरणपूरक प्रकल्प उभे राहत आहेत. या कामांसाठी जिथे आवश्यकता असेल, तेथे शासन पूर्णपणे सोबत राहील.

मुख्यमंत्री यांनी या मोहिमेचा उद्देश स्पष्ट करत सांगितले की, चार हजार वर्षांपूर्वी असलेले जोतिबा डोंगर परिसरातील जंगल पुन्हा “दख्खन केदारण्य” या नावाने पुनर्निर्मित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात श्रद्धाळू भेट देतात, त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी आणि निसर्ग संवर्धनासाठी हे उपक्रम महत्त्वाचे आहेत.

जोतिबा मंदिर व परिसर विकास आराखड्याचा प्रमुख भाग म्हणजे जोतिबा डोंगर हिरवागार करणे. श्रीक्षेत्र ज्योतिर्लिंग देवस्थान येथे मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी उत्तम सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि डोंगर परिसरातील वातावरणही उल्हासित राहावे, यासाठी विकास आराखड्यातून कामे होतील, अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमस्थळी आमदार डॉ. विनय कोरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मोशी आपत्तीने विकेंद्रित कचरा प्रक्रियेवर वाद सुरू केला. पुणे बातम्या

मोशी येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर बचावकर्ते त्यांच्या पुढच्या टप्प्याचे नियोजन करत आहेत पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये दररोज तयार होणारा किमान 1,150 मेट्रिक टन कचरा...

मतदार मोहिमेकडे दुर्लक्ष केल्याबद्दल चुकीच्या BLO विरुद्ध FIR. पुणे बातम्या

बीएलओ आणि टीममधील इतर अधिकारी पुण्यातील शनिवार पेठ आणि जेएम रोड येथे नागरिकांची भेट घेतात. पुणे : मतदार याद्यांच्या चालू असलेल्या विशेष गहन...

मतदार यादी मोहीम घरोघरी जाते, प्रक्रिया गतिमान करण्यासाठी बीएलओ शिबिरे घेतात. पुणे बातम्या

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बूथ-स्तरीय अधिकाऱ्यांना (BLO) निवडणूक आयोगाच्या विशेष गहन पुनरावृत्ती (SIR) व्यायामाचा काही भाग घरामध्ये...

9 दिवसांच्या मुसळधार पावसाने महाराष्ट्रातील मान्सूनची तूट पुसली; पुणे, मुंबई सर्वाधिक नफा मिळवणाऱ्यांमध्ये |...

पुण्यातील जलाशयांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसानंतर अधिकाऱ्यांनी खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर जलमय झालेले दृश्य एक विहंगम दृश्य दाखवते. पुणे : जून महिना संपल्यानंतर...

साडेपाच कोटींहून अधिक किमतीच्या मेफेड्रॉनसह सराईत गुन्हेगारास अटक; गुन्हे शाखेची मोठी कारवाई

​पुणे: 'ड्रग्ज फ्री' पुणे करण्याचे ध्येय गाठण्यासाठी पुणे शहर पोलीस दलाने अंमली पदार्थ विक्रेत्यांविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून, पुणे शहर गुन्हे...

error: Content is protected !!