Homeताज्या बातम्याज्येष्ठ पत्रकारास बातमी डिलेट कर अन्यथा तुला डिलीट करून टाकीन अशी ठार...

ज्येष्ठ पत्रकारास बातमी डिलेट कर अन्यथा तुला डिलीट करून टाकीन अशी ठार मारण्याची धमकी….

ज्येष्ठ पत्रकारास बातमी डिलेट कर अन्यथा तुला डिलीट करून टाकीन अशी ठार मारण्याची धमकी….

सहसंपादक शिवाजी दवणे
क्राईम महाराष्ट्र न्यूज 9730170965

जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनेने केला या घटनेचा निषेध…
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील वरिष्ठ पत्रकार व दैनिक जय बाबा वृत्तपत्राचे संपादक बाळासाहेब शंकराव आगे यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पत्रकार संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे.
संपादक बाळासाहेब आगे यांनी 16 ऑगस्ट रोजी त्यांच्या dainik_jay_baba_ या इन्स्टाग्राम अकाऊंटवर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नशेच्या इंजेक्शनसह महिला अटक झाल्याची बातमी व संबंधित एसडीपीओंचा व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. या वृत्तात आरोपी गणेश मुंडे याचे नाव आले होते. त्यानंतर _ganesh._.mundhe_3 _.mundhe_307 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे वृत्त डिलीट कर, नाहीतर तुला डिलीट करून टाकीन अशा आशयाचा धमकीचा संदेश आगे यांना दिला आहे.
पत्रकाराला थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने पत्रकार समाजात संतापाची लाट उसळली आहे.
गेली 35 ते 40 वर्षांपासून श्रीरामपूरात अनेक पत्रकार राजकीय, सामाजिक आणि गुन्हेगारी विषयांवर सडेतोड लिखाण करीत आहेत. मात्र आजवर कोणत्याही पत्रकाराला अशा प्रकारे धमकी मिळाली नव्हती. पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे वृत्त प्रसारित केल्यानंतर धमक्या मिळत असतील, तर शहर पत्रकारितेसाठी कितपत सुरक्षित राहिले आहे, असा प्रश्न पत्रकारांकडून उपस्थित केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर प्रेस क्लब, श्रीरामपूर पत्रकार संघ, श्रीरामपूर तालुका मराठी पत्रकार संघ, बेलापूर पत्रकार संघ आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया संघटनेच्या प्रतिनिधींनी घटनेचा निषेध करून आरोपीवर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या बैठकीस प्रेस क्लबचे अध्यक्ष बाळासाहेब भांड, श्रीरामपूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश रक्ताटे, श्रीरामपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक गाडेकर, सचिव प्रकाश कुलथे, खजिनदार अनिल पांडे, उपाध्यक्ष करण नवले, विकास अंत्रे, सहसचिव महेश माळवे, राजेंद्र बोरसे, शिवाजी पवार, रवी भागवत, कामगार नेते नागेश सावंत , जेष्ठ पत्रकार मनोजकुमार आगे, प्रदीप आहेर, नितीन शेळके, उपाध्यक्ष सलीम खान पठाण, सचिव सचिन उघडे, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे असलम बिनसाद, बेलापूर पत्रकार संघाचे देविदास देसाई, दिलीप दायमा, सुहास शेलार आदी यावेळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील निवृत्त ऑटोमोबाईल इंजिनिअरची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी १.१ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. पुणे...

पुणे : कोथरूड येथील पौड रोड येथील सेवानिवृत्त ऑटोमोबाईल अभियंता (71) यांनी पुणे सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, ऑनलाइन शेअर ट्रेडिंगमधील...

महाराष्ट्र खाजगी कंपन्यांच्या वार्षिक ऑडिट दरम्यान पॉश कायद्याचे पालन बंधनकारक करणार आहे. पुणे बातम्या

पुणे : कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, प्रतिबंध आणि निवारण) कायदा, 2013 (पॉश कायदा) ची अंमलबजावणी मजबूत करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने...

वडगाव शेरी येथे पुणे पोलिसांची मोठी कारवाई; ३ लाख ६५ हजारांचा बेकायदेशीर गुटखा आणि...

पुणे (विशेष प्रतिनिधी): अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई केली आहे. वडगाव शेरी परिसरातील एका गोदामावर छापा...

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांना सक्षम करण्यासाठी ड्रोन आणि EV दुरुस्ती अभ्यासक्रम सुरू केले...

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांसाठी अभ्यासक्रम सुरू केले आहेत पुणे : क्वीन मेरीज टेक्निकल इन्स्टिट्यूट (QMTI) ने अपंग सैनिकांसाठी ड्रोन तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक...

‘सिया गोयलची विग टिप्पणी, जबरदस्ती लग्न, गुप्त संबंध’: केतन अग्रवाल खून प्रकरणात ट्विस्टनंतर ट्विस्ट....

पोलिसांनी केतन अग्रवालची मंगेतर, सिया गोयल (20) आणि तिचा कथित साथीदार, चेतन चौधरी (22) यांना अटक केली आहे, त्यांच्यावर 18 जून रोजी 25...

error: Content is protected !!