वडगाव मावळ – तळेगाव दाभाडे शहरात शुक्रवारी (दि. ३१) एका तरूणाचा खून करण्यात आला. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. आर्यन बेडेकर (वय १९, रा. सिद्धार्थ नगर, तळेगाव दाभाडे) असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव स्टेशन भागात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करीत आर्यनची हत्या केली आणि घटनास्थळावरून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला असून पुढील तपास सुरू आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























