ताज केवळ हॉटेल नाही, तर प्रत्येक भारतीयाचा अभिमान’
मुंबई-;; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वांद्रे, मुंबई येथे ‘ताज बॅण्डस्टॅण्ड’ हॉटेलचे भूमिपूजन केले. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी टाटा समूह, इंडियन हॉटेल्स कंपनी यांचे नवीन प्रकल्पासाठी अभिनंदन केले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाटा समुहाचे सर्वेसर्वा दिवंगत रतन टाटा यांच्या आठवणींना उजाळा दिला. हे हॉटेल रतन टाटा यांच्या महत्त्वपूर्ण स्वप्नांपैकी एक होते, ते आता प्रत्यक्षात उतरत असल्याचा आनंद होत आहे. या हॉटेलमुळे वांद्रे परिसराच्या सौंदर्यात भर पडेल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.
देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह नागपूरमध्ये ताज हॉटेल सुरु करावे, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. ताज हॉटेलच्या सुरुवातीचा प्रवास अतिशय थक्क करणारा आहे, या प्रवासाची सुरुवात प्रत्येक भारतीय नागरिकासाठी प्रेरणादायी आहे. ताज केवळ हॉटेल नसून प्रत्येक भारतीयाचा अभिमान असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी म्हटले.
यावेळी मंत्री आशिष शेलार, टाटा समूहाचे अध्यक्ष एन.चंद्रशेखरन, द इंडियन हॉटेल्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते

सूचना / Disclaimer:
या पोर्टलवरील सर्व बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि मजकूर हे केवळ माहिती व जनहितासाठी प्रसारित केले जातात. आमचा उद्देश कुणाच्याही भावना दुखावणे किंवा अफवा पसरवणे हा नाही. कोणतीही माहिती प्रसारित करण्यापूर्वी आम्ही ती सत्य व खात्रीशीर असल्याची पुष्टी करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.