Homeताज्या बातम्यालोणीकंद पोलिसांची मोठी कारवाई; ३५ लाखांच्या 'एमडी' ड्रग्जसह ६ आरोपींना बेड्या

लोणीकंद पोलिसांची मोठी कारवाई; ३५ लाखांच्या ‘एमडी’ ड्रग्जसह ६ आरोपींना बेड्या

पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवली जात असताना, लोणीकंद पोलिसांनी गेल्या आठवड्यात धडाकेबाज कामगिरी केली आहे. अमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी सापळे रचून एकूण ६ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून ३४,९८,८०० रुपये किमतीचे १७४.९५ ग्रॅम मॅफेड्रॉन ड्रग्ज (एम.डी) पावडर जप्त केली आहे.
​पहिली कारवाई: कटकेवाडी फाटा
​वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सुनिता रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार कैलास साळुंके व स्वप्नील जाधव यांना गोपनीय माहिती मिळाली. या माहितीनुसार, दि. १९/०४/२०२६ रोजी कटकेवाडी फाटा येथून पुंजाजी जयचंद्र चौधरी (वय ४०, रा. वाघोली, मूळ- बुलढाणा) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ४,३७,२०० रुपयांचे २१.८६० ग्रॅम एम.डी. आणि आयफोन असा एकूण ४,८७,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
​दुसरी कारवाई: पेरणे फाटा
​दिनांक २०/०४/२०२६ रोजी पेरणे फाटा येथे पोलिसांनी सापळा लावून दोन जणांना अटक केली. यामध्ये:
१) राजेंद्र केरु टेळे (वय ३५, रा. शिक्रापूर)
२) करन सचिन मोहिते (वय २१, रा. सणसवाडी) यांचा समावेश आहे.
यांच्याकडून ५९.१६० ग्रॅम एम.डी. पावडर, एक कार, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण १४,१०,९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
​तिसरी कारवाई: मगर वस्ती
​अटक केलेल्या आरोपींकडे केलेल्या सखोल चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २२/०४/२०२६ रोजी मगर वस्ती, लोणीकंद येथून आणखी दोघांना अटक करण्यात आली.
१) भागीरथसिंग सज्जनसिंग राजपुरोहित (वय २८, रा. मांजरी, मूळ- राजस्थान)
२) आदिनाथ दशरथ शिर्के (वय २९, रा. मांजरी).
यांच्याकडून २१.४३० ग्रॅम एम.डी. आणि एक कार असा एकूण ८,३४,०२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
​चौथी कारवाई: शिरवळ कनेक्शन
​वरील पाचही आरोपींकडे एकत्रित तपास केल्यानंतर या साखळीतील सहावा आरोपी योगेश लक्ष्मण चव्हाण (वय ३७, रा. शिरवळ, जि. सातारा) याला दि. २३/०४/२०२६ रोजी ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून तब्बल ७२.५०० ग्रॅम एम.डी. पावडर (किंमत १४,५०,००० रुपये) जप्त करण्यात आली आहे.
​एकूण जप्त मुद्देमाल:
या संपूर्ण मोहिमेत पोलिसांनी एकूण ३४,९८,८०० रुपये किमतीचे ड्रग्ज, दोन कार, मोबाईल फोन आणि रोख रक्कम जप्त केली आहे. सर्व सहा आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, अंमली पदार्थांचे हे जाळे नेमके कोठपर्यंत पसरले आहे, याचा अधिक तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई: काळेपडळमधून सुगंधी गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त, आरोपीला ठोकल्या...

पुणे, दिनांक २६ जून २०२६: महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी गुटखा, सुपारी आणि तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात पुणे शहर पोलिसांच्या काळेपडळ पोलीस...

‘केतनने मला सांगितले की लग्न मोडण्यास उशीर झाला आहे’: पोलिसांनी म्हटले आहे की सिया...

चॅट्स सिया गोयलच्या विधानांच्या विरोधात आहेत, लोणावळा पोलिस म्हणतात लोणावळा: रियाल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे, पोलिसांनी दावा केला...

लोहगड किल्ला खून प्रकरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केतन अग्रवालच्या वडिलांची भेट घेतली, जलदगती...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलदगती न्यायालयाचे आदेश दिले असून धक्कादायक लोहगड किल्ला हत्याकांडप्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली...

​कर्बलाच्या शहीदांच्या स्मरणार्थ एकतेची मिसाल: मोहरमच्या रात्री पुण्यात सरबतासाठी मोफत साखर वाटप

​पुणे, दि. २५ जून २०२६: मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना 'मोहरम'च्या नवव्या दिवशी, म्हणजेच 'कत्तलची रात्र' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रात्री, 'पंजेतन पवित्र संघटना, महाराष्ट्र राज्य' यांच्या...

मुंबई लोकल हत्या: ‘सोशल मीडिया ट्रायल’मुळे आमच्या आयुष्यावर, नोकऱ्यांवर परिणाम; असे आरोपीच्या कुटुंबीयांचे म्हणणे...

सोशल मीडिया ट्रायलमुळे आमचे जीवन आणि नोकऱ्यांवर परिणाम होत आहे, असे मुंबई लोकल ट्रेनवर चाकूहल्ला करणाऱ्या आरोपीचे नातेवाईक म्हणतात मुंबई: मुंबई लोकल ट्रेनमध्ये...

error: Content is protected !!