पुणे:
गुजरात येथून ट्रॅव्हल्स बसमधून पुणे शहरात विक्रीसाठी आणलेला तब्बल २२,९१,५३४/- (बावीस लाख एक्याण्णव हजार पाचशे चौतीस) रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात नऱ्हे पोलिसांना मोठे यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध नऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुप्त बातमीदाराकडून मिळाली खबर
नऱ्हे पोलीस ठाणे, पुणे शहर हद्दीत तपास पथक गस्त घालत असताना, पोलीस अंमलदार देवा चव्हाण यांना एका ट्रॅव्हल्स बसमधून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी घेऊन जात असल्याची खात्रीशीर माहिती (खबर) मिळाली.
नवले ब्रिजखाली सापळा आणि पहिली कारवाई
माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती वर्षा देशमुख, पोलीस निरीक्षक (गुन्हे) ईश्वर चव्हाण, आणि पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे यांच्यासह तपास पथकाने तातडीने हालचाली करत नवले ब्रिजखाली सापळा रचला. संशयास्पद ट्रॅव्हल्स बस थांबवून तिची तपासणी केली असता, त्यात प्रतिबंधित गुटखा आढळून आला.
या कारवाईदरम्यान ट्रॅव्हल्स चालक हबास मुबारक खान (वय ३४ वर्षे, रा. जिल्हा बाडमेर, राज्य राजस्थान) याच्याकडून विमल पानमसाला, व्हि १ तंबाखू, आर एम डी पानमसाला, तुळसी तंबाखू आणि गोवा गुटखा असा एकूण ५,९०,८००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी चालकासह हा माल विकत घेणारा आरोपी सोहेल अस्लम मुलाणी (वय २२ वर्षे, रा. ६६७, गंजपेठ, पुणे) याला जागीच ताब्यात घेतले.
केदारीनगर येथील गोडाऊनवर छापा
आरोपी सोहेल मुलाणी याच्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, त्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी केदारीनगर, पुणे येथील एका गोडाऊनमध्ये आणखी माल लपवून ठेवल्याची कबुली दिली. पोलिसांनी सदर गोडाऊनवर छापा टाकून विमल पानमसाला, व्हि १ तंबाखू, आर एम डी पानमसाला, तुळसी तंबाखू आणि गोवा गुटखा असा आणखी १७,००,७३४/- रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त केला. हा माल त्यांनी अहमदाबाद (गुजरात) येथून खरेदी केल्याचे आरोपींनी कबूल केले आहे.
विविध कलमांन्वये गुन्हा दाखल
याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध नऱ्हे पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. ११४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) २०२३ चे कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) तसेच सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम २००३ चे कलम ७(२), २०(२) आणि अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ चे कलम २६(२)(i)(iv) नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे करत आहेत.
कामगिरी करणारे पोलीस पथक
सदरची यशस्वी कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर) श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ ३, पुणे शहर) श्री. सागर कवडे, आणि मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (सिंहगडरोड विभाग, पुणे शहर) श्री. विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत खालील अधिकारी व अंमलदारांच्या पथकाचा सहभाग होता:
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती वर्षा देशमुख
पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. ईश्वर चव्हाण
पोलीस उप-निरीक्षक विजयसिंह घाडगे
पोलीस उप-निरीक्षक किरण लिटे
पोलीस अंमलदार देवा चव्हाण
पोलीस अंमलदार सुनील चव्हाण
पोलीस अंमलदार कार्तिक कोंडे
पोलीस अंमलदार प्रणिल मेस्त्री
पोलीस अंमलदार सुमित जगताप
पोलीस अंमलदार राजु तोरे
पोलीस अंमलदार नितीन वाघमारे
पोलीस अंमलदार निलेश भोरडे

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























