पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई: दरोडा, घरफोडी व वाहन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना बेड्या; १२ गुन्हे उघडकीस!
पुणे (दि. ४ नोव्हेंबर २०२६) – पुणे ग्रामीण जिल्ह्या Mध्ये वाढत्या घरफोड्या, दरोडे आणि वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने एका मोठ्या कारवाईत सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी दोघा अट्टल गुन्हेगारांना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल १५,५०,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पुणे व सोलापूर ग्रामीणमधील तब्बल १२ गुन्हे उघडकीस आले आहेत.
कारवाईची पार्श्वभूमी व सापळा
पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल यांनी जिल्ह्यात घडलेल्या गुन्ह्यांचा समांतर व कसून तपास करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते. त्यानुसार, अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. चैतन्य कदम व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तपास करत होते.
दिनांक ०१/११/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज व त्यांचे पथक इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घाबत असताना, घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी इंदापूर येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुणे-सोलापूर बायपास रोडवरील जगदंब हॉटेलजवळ सापळा रचून तीन इसमांना ताब्यात घेतले.
आरोपींची नावे व जप्त मुद्देमाल
चौकशीदरम्यान ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे १) मोबाईल उर्फ हरी पवार (वय २२, रा. सुगाव भोसे, ता. पंढरपूर) आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालक अशी निष्पन्न झाली. तसेच वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातील जबरी चोरीच्या गुन्ह्यात शक्तिमान हृबऱ्या काळे (वय २२, रा. माळेगाव, ता. बारामती) यालाही अटक करण्यात आली आहे.
आरोपींकडून खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे:
सुमारे १० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने
दोन मोटारसायकल (युनिकॉर्न क्र. MH-13 EQ-4910 आणि स्प्लेंडर क्र. MH-13-DW-2723)
दौंड येथील घरफोडीतील चोरी गेलेला मोबाईल फोन
एकूण किंमत: १५,५०,००० रुपये
हे गुन्हे झाले उघड
आकडेवारीनुसार, आरोपींनी पुणे ग्रामीण जिल्ह्यात दरोड्याचा १, जबरी चोरीचा १, घरफोडीचे ८ आणि सोलापूर ग्रामीणमध्ये मोटारसायकल चोरीचे २ असे एकूण १२ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने दौंड, इंदापूर, वालचंदनगर, भिगवण, वडगाव निंबाळकर, करकंब व पंढरपूर पोलीस ठाण्याकडील दाखल गुन्ह्यांचा समावेश आहे.
सदर धडाकेबाज कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, इंदापूर व वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने केली असून, पुढील तपास दौंड पोलीस स्टेशन करत आहे.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























