Homeताज्या बातम्या​पुणे पोलिसांची मोठी कारवाई: १७ हून अधिक गंभीर गुन्हे असलेला रेकॉर्डवरील फरारी...

​पुणे पोलिसांची मोठी कारवाई: १७ हून अधिक गंभीर गुन्हे असलेला रेकॉर्डवरील फरारी गुन्हेगार ‘पॅडी’ गुन्हे शाखेकडून जेरबंद

पुणे, दिनांक ०१ जुलै २०२६:
पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने एक मोठी कारवाई करत, मांजरी पोलीस स्टेशनच्या शस्त्र अधिनियमाच्या गुन्ह्यातील फरार आणि रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला मुसक्या आवळल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्रथम उर्फ पॅडी सुरेश म्हस्के (वय २२ वर्षे, रा. सन १३२, पर्वती पायथा, ढमढरे गॅस एजन्सी जवळ, सिंहगड रोड, पुणे) असे आहे. आरोपीवर खुनाचा प्रयत्न तसेच शरीराविरुद्धचे १७ पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
​निलायम टॉकीज परिसरात घातला सापळा
​मिळालेल्या माहितीनुसार, १ जुलै २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट २ च्या हद्दीत महिला पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार आणि त्यांचे स्टाफ गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत होते व पाहिजे असलेल्या फरारी आरोपींचा शोध घेत होते. गस्तीदरम्यान पोलीस अंमलदार संदीप शिर्के यांना खात्रीशीर बातमी मिळाली की, मांजरी पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गु.र.नं २६/२०२६ शस्त्र अधिनियम ३ (२५) मधील पाहिजे असलेला फरारी आरोपी प्रथम उर्फ पॅडी सुरेश म्हस्के हा पर्वती येथील निलायम टॉकीज परिसरात फिरत आहे.
​वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने कारवाई
​सदर माहिती मिळताच, गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे यांना तात्काळ याबाबत अवगत करण्यात आले. त्यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. आदेश मिळताच पोलीस पथकाने निलायम टॉकीज परिसरात जाऊन संशयित इसमाचा शोध घेतला आणि त्याला शिताफीने ताब्यात घेतले.
​ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव प्रथम उर्फ पॅडी सुरेश म्हस्के असल्याचे सांगितले. त्यानंतर मांजरी पोलीस स्टेशन येथे संपर्क साधून खात्री केली असता, तो सदर गुन्ह्यात पाहिजे असलेलाच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला मांजरी पोलीस स्टेशन येथे हजर केले असून, गु.र.नं. २६/२०२६ शस्त्र अधिनियम ३ (२५) अन्वये त्याला रीतसर अटक करण्यात आली आहे.
​कामगिरी करणारे पोलीस पथक
​सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. गौहर हसन, आणि मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पाडण्यात आली.
​या कारवाईत खालील अधिकारी व अंमलदारांचा समावेश होता:
​अधिकारी: वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक अविनाश माने, महिला पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार, आणि पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी.
​पोलीस अंमलदार: संदीप शिर्के, विशाल दळवी, ऋषिकेश व्यवहारे, उज्ज्वल मोकाशी, सर्जेराव सरगर, संतोष टकले, शंकर नेवसे, विजयकुमार पवार, शंकर कुंभार, योगेश मांढरे, संजय आबनावे, अजीम शेख, ओमकार कुंभार आणि सद्दाम तांबोळी.
​महिला पोलीस अंमलदार: साधना ताम्हाणे आणि विद्या शिंदे.
​या धडक कारवाईमुळे पुणे शहरातील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्रात अनेक दशकांपासून मतदार आहेत, परंतु 2002 मधील कौटुंबिक दुवा या यादीत सामर्थ्य आहे....

बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष गहन पुनरिक्षण (SIR) साठी फॉर्म घेऊन जातात. पुणे: भारतीय निवडणूक आयोगाच्या मतदार यादीचे विशेष गहन...

साक्षीदार नाही, पण सुगावाचा माग: केतन अग्रवाल खून प्रकरणात पोलिसांनी एकत्र नांगी; पॉलीग्राफ चाचणी,...

रिया गोयल (आर) आणि तिचा कथित प्रियकर, चेतन चौधरी (एल), रिअल्टर केतन अग्रवाल (एम) च्या कथित हत्येप्रकरणी पॉलीग्राफ आणि चाल विश्लेषण चाचण्यांना सामोरे...

चिंचवडमध्ये गाडी थांबवण्यावरून झालेल्या वादाला हिंसक वळण; दोन गट आरक्षित | पुणे बातम्या

चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथे मंगळवारी कार रस्त्यात थांबविण्यावरून दोघांमध्ये झालेल्या वादाला हिंसक वळण लागले. दोघांनी त्यांच्या साथीदारांना बोलावले,...

‘मैं ना थोडी फनी टाइप की हूं’: केतन अग्रवालच्या मृत्यूची खिल्ली उडवणाऱ्या डेंटिस्टने माफी...

पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल यांच्या मृत्यूवर प्रकाश टाकल्याबद्दल मोठ्या प्रमाणावर टीकेचा सामना करणारे दंतचिकित्सक. भोपाळ: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल यांच्या मृत्यूबद्दल मोठ्या प्रमाणावर...

‘पहिला तो फसवतो, नंतर कॉल करतो’: व्हायरल जुनी क्लिप नाईट क्लबमध्ये गरम झालेल्या फोन...

तिचा मंगेतर केतन अग्रवालच्या कथित हत्येतील प्रमुख आरोपी सिया गोयलचा जुना व्हिडिओ पुन्हा एकदा ऑनलाइन वर आला आहे. पुणे: तिचा मंगेतर केतन अग्रवालच्या...

error: Content is protected !!