Homeताज्या बातम्यापुणे पोलीस दलाची कौतुकास्पद कामगिरी: अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीविरुद्ध अवघ्या २४...

पुणे पोलीस दलाची कौतुकास्पद कामगिरी: अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीविरुद्ध अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल

पुणे:
हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमाविरुद्ध पुणे पोलिसांनी अत्यंत जलदगतीने कारवाई केली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या २४ तासांच्या आत तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र (Charge sheet) सादर करत पोलिसांनी गुन्हेगारांना जरब बसेल असा आदर्श घालून दिला आहे.
​नेमकी घटना काय?
​दिनांक ११/०५/२०२६ रोजी माळवाडी, पुणे येथील शिवसेना चौक, साधना शाळेजवळ ही घटना घडली. पीडित मुलगी (निर्भया) ही खेळत असताना ती एकटी असल्याचे पाहून आरोपी मसा दशरथ राजगुरु (वय ३२ वर्षे, रा. गाव सैफुल, ता. सोलापूर, जि. सोलापूर) याने तिचा विनयभंग केला. याप्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार प्राप्त होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद साने यांनी तात्काळ दखल घेऊन गुन्हा नोंदवला.
​कायदेशीर कारवाई
​आरोपीविरुद्ध हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गु. र. नं. ३४४/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ७४ आणि पोक्सो कायदा २०१२ (POCSO) कलम ८ व १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
​तपास आणि अटक
​गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी आरोपीच्या अटकेसाठी दोन स्वतंत्र पथके नियुक्त केली. या पथकांनी तांत्रिक माहिती आणि मार्गदर्शनानुसार आरोपीचा शोध घेऊन त्यास हडपसर परिसरातून ताब्यात घेतले आणि तपासी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक रत्नदिप बिराजदार यांच्या समक्ष हजर केले.
​२४ तासांत दोषारोपपत्र
​पोलीस उप-निरीक्षक रत्नदिप बिराजदार यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून अत्यंत प्रभावीपणे तपास चक्र फिरवले. त्यांनी अवघ्या २४ तासांच्या आत आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सध्या माननीय न्यायालयाने आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
​या पथकाने केली कामगिरी
​ही उल्लेखनिय कामगिरी खालील पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने केली आहे:
​मार्गदर्शन: पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ ६) श्री. सागर कवडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (हडपसर विभाग) श्री. अतुलकुमार नवगिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय मोगले, आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे.
​प्रत्यक्ष कारवाई व तपास: सहा. पोलीस निरीक्षक विनोद साने, पोलीस उप-निरीक्षक रत्नदिप बिराजदार.
​सहकार्य: पोलीस अंमलदार संभाजी म्हांगरे, उमेश मानकर, प्रकाश सावंत, आणि आकाश धावडे.
​पुणे पोलिसांच्या या गतिमान कार्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वानोवरी आणि पुणे कॅन्टमध्ये पावसाळ्यातील पूर टाळण्यासाठी पीएमसीने भैरोबा नाल्यातील गाळ काढण्यास सुरुवात केली....

पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून जाणाऱ्या भैरोबा नाल्यावरील पावसाळ्याला जेमतेम आठवडे उरले असताना पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) गाळ काढण्याचे आणि गाळ काढण्याचे काम...

तापमान वाढीमुळे अनेक भागात डासांची समस्या उद्भवते, रहिवाशांना नियमित फवारणी आणि चांगली स्वच्छता हवी...

पुणे: दिवसा आणि रात्रीच्या तापमानात वाढ झाल्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये डासांची संख्या वाढली आहे, ज्यामुळे रहिवाशांनी, विशेषत: पाणवठ्यांजवळ राहणाऱ्या नागरिकांनी नागरी प्रशासनाने नियमित धुरीकरण...

​पुणे पोलिसांची मोठी कारवाई: खुनाचा कट रचणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तिघे अटकेत

पुणे: पूर्ववैमनस्यातून खुनाचा कट रचणाऱ्या एका टोळीला पुणे शहर गुन्हे शाखा युनिट ७ च्या पथकाने शस्त्रांसह अटक केली आहे. वेळेत कारवाई केल्यामुळे पोलिसांनी एक...

आईच्या प्रियकराचा मुलीच्या प्रियकराकडून खून; काळेपडळ पोलिसांनी ४८ तासांत ६ आरोपींना ठोकल्या बेड्या

पुणे: आईच्या प्रियकराचा, मुलीच्या प्रियकराने आपल्या साथीदारांच्या मदतीने डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना हडपसर परिसरातील ससाणेनगर येथे घडली होती. या...

IMD ने महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला; गरम दिवस आणि उकाड्याच्या रात्री पुणे |...

पुणे: भारतीय हवामान विभागाने (IMD) मंगळवारी महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला असून, येत्या काही दिवसांत सतत उच्च तापमान आणि रात्रीच्या वेळी...

error: Content is protected !!