Homeताज्या बातम्या"पुणे मनपा शाळा क्र. १७ मध्ये आर्थिक भ्रष्टाचार आणि वीजचोरी प्रकरण; दोषींवर...

“पुणे मनपा शाळा क्र. १७ मध्ये आर्थिक भ्रष्टाचार आणि वीजचोरी प्रकरण; दोषींवर कारवाईपूर्वी नवीन प्रकल्पास राबविण्यास विरोध – युवक काँग्रेसचा इशारा”

अं
पुणे-
प्रभाग क्र. २७, नवी पेठ येथील पुणे महानगरपालिका शाळा क्र. १७ (धर्मवीर संभाजी महाराज विद्यालय) येथे २०१८ पासून सत्ताधारी नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून अनधिकृतपणे अभ्यासिका व व्यायामशाळा चालवून विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारण्यात आल्याचा संशय असून, या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप युवक काँग्रेसचे सरचिटणीस सागर धाडवे यांनी केला आहे.
याशिवाय, या ठिकाणी झालेल्या कथित वीजचोरीप्रकरणी महावितरणने पुणे महानगरपालिकेला ₹२,३३,३९० रुपयांचा दंड ठोठावला असून, तो मनपाने भरल्याची बाब अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणासंदर्भात मनपाचे अपील महावितरणकडे प्रलंबित असून, यामुळे पुणे महानगरपालिकेची प्रतिमा मलिन झाली असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या संदर्भात दि. ०८ मे २०२५ रोजी उपआयुक्त (शिक्षण विभाग) तसेच दि. १९ मे २०२५ रोजी पुणे महानगरपालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, अद्याप संबंधित दोषींवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने युवक काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सागर धाडवे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी पूर्ण होऊन दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत सदर जागेवर कोणताही नवीन प्रकल्प, बांधकाम किंवा विकासकाम सुरू करू नये. अन्यथा पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत संबंधितांविरोधात तसेच नवीन प्रकल्प मंजूर करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांच्या विरोधात न्यायालयीन लढा उभारला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
युवक काँग्रेसने या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार, सार्वजनिक मालमत्तेचा अनधिकृत वापर आणि वीजचोरीची जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकारी व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
यावेळी सागर धाडवे यांनी सदर तक्रार आयुक्त पुणे मनपा, उपायुक्त शिक्षण विभाग, विरोधी पक्षनेते पुणे मनपा, गटनेता काँग्रेस पुणे मनपा यांकडे ही कळवली आहे .

सागर धाडवे
सरचिटणीस, युवक काँग्रेस, पुणे शहर.
संपर्क – 9762792769

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘सियाला कॅबमध्ये बसायचे नव्हते’: बाली ट्रिपच्या अगोदर, कॅब ड्रायव्हरच्या दाव्यामुळे साहिल गोयल केतन अग्रवाल...

(L-R) कॅब चालक (इमेज -सोशल मीडिया), केतन अग्रवाल, सिया गोयल आणि भाऊ साहिल गोयल पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या काही दिवस...

‘आमच्याद्वारे नियुक्त केलेले नाही’: भाऊ साहिलने केतन अग्रवाल हत्येच्या तपासात सिया गोयलच्या बचावासाठी वकील...

आरोपी सियाच्या भावाचे म्हणणे आहे की, कुटुंबाने आशुतोष श्रीवास्तव यांना वकील म्हणून नियुक्त केले नाही पुणे: सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याने वकील...

लोणीकंद परिसरात नाकाबंदी दरम्यान मोक्का व खुनाच्या गुन्ह्यातील ३ कुख्यात आरोपी जेरबंद; पिस्टलसह ६.३६...

पुणे (प्रतिनिधी): पुणे शहर पोलिसांच्या लोणीकंद पोलीस स्टेशनच्या वतीने गुन्हेगारी टोळ्यांवर वचक निर्माण करण्यासाठी एक मोठी आणि यशस्वी कामगिरी करण्यात आली आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या...

भारती विद्यापीठ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी: जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक; १ लाख ३०...

पुणे: पुणे शहर पोलीस दलाच्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने जबरी चोरीच्या एका गंभीर गुन्ह्याचा छडा लावत एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. या...

‘फक्त एक सिग्नल नाही’: लोहगडच्या कड्यावर केतनच्या शेवटच्या पोहोचण्यापासून सिया गोयलचे संरक्षण करण्यासाठी पोलिसांनी...

सिया गोयल (20) आणि चेतन चौधरी (22) यांना 18 जून रोजी पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावरील 25 वर्षीय केतन अग्रवालला ठार मारण्याचा कट रचल्याप्रकरणी...

error: Content is protected !!