Homeताज्या बातम्यापुणे महापालिकेच्या मालमत्तेतील गैरप्रकारावर युवक काँग्रेसचा एल्गार; सागर धाडवे उपोषणाला बसले

पुणे महापालिकेच्या मालमत्तेतील गैरप्रकारावर युवक काँग्रेसचा एल्गार; सागर धाडवे उपोषणाला बसले

पुणे, दि. ९ मार्च :
पुणे महानगरपालिकेच्या मालकीच्या कै. भानुदास गेजगे व्यायामशाळा व कार्यालय संदर्भात अनधिकृत करारनामा करून मनपाची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन आणि लक्षणीय उपोषण करण्याचा इशारा युवक काँग्रेसचे सरचिटणीस सागर धाडवे यांनी दिला आहे.
या संदर्भात त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाला लेखी निवेदन दिले असून, यापूर्वीही ४ ऑगस्ट २०२५ रोजी या प्रकरणाबाबत तक्रार करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे. मात्र अद्यापपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
धाडवे यांच्या मते, पुणे महानगरपालिकेच्या मालकीची असलेली कै. भानुदास गेजगे व्यायामशाळा आणि कार्यालय ही जागा अनधिकृत पद्धतीने सानेगुरुजी तरुण मंडळाला देण्यात आली असून या संदर्भात नियमबाह्य करारनामा करण्यात आला आहे. त्यामुळे ही जागा तात्काळ मंडळाकडून काढून घेऊन महानगरपालिकेने आपल्या ताब्यात घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच तत्कालीन क्रीडा उपायुक्त किशोरी शिंदे यांनी कायदेशीर पडताळणी न करता संबंधित मंडळासोबत उपनिबंधक कार्यालयात जाऊन करारनामा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या व्यायामशाळेसंदर्भात महावितरणने कारवाई करून ₹९५ हजारांचा दंड आकारला असल्याचेही समोर आले आहे. हा दंड रोख स्वरूपात पुणे महानगरपालिकेच्या नावे भरल्याची माहिती मिळत असून या व्यवहाराचीही सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच व्यायामशाळा भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या सानेगुरुजी तरुण मंडळावर पुणे येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयाने अनियमित व्यवहारांमुळे ₹५ हजारांचा दंड ठोठावल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अशा मंडळाकडून महानगरपालिकेची मालमत्ता तात्काळ परत घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
सदर व्यायामशाळेचे क्षेत्रफळ सुमारे ३५०० चौ.फुट असून कार्यालय सुमारे ५०० चौ.फुट आहे. या कार्यालयाचा वापर राजकीय स्वार्थासाठी राजकीय पक्षाच्या कार्यालयाप्रमाणे केला जात असल्याची तक्रार असल्याने या बाबीची चौकशी करून संबंधित जागा महानगरपालिकेने ताब्यात घ्यावी, असेही धाडवे यांनी म्हटले आहे.
याशिवाय ही व्यायामशाळा मागील सुमारे ११ वर्षे एका नगरसेवकांच्या ताब्यात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर मागील वर्षी ती महानगरपालिकेच्या ताब्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मागील ११ वर्षे अनधिकृत ताबा ठेवणाऱ्या संबंधित नगरसेवकांवर आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या सर्व प्रकरणाचा अंतिम निर्णय सध्या पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्या कार्यालयात प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले असून प्रशासनाने तात्काळ चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा आंदोलन आणि उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चार आमदारांच्या वक्तव्यांवर कारवाई करा; राष्ट्रीय दलित पॅंथर सेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

पुणे | प्रतिनिधी (Crime Maharashtra Live News) आज दिनांक ९ मार्च २०२६ रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय दलित पॅंथर सेनेच्या वतीने आंदोलन करून निषेध व्यक्त...

तांत्रिक अडचणी, ई-केवायसी अडथळे: पेआउट येत राहण्यासाठी लाडकी बहिंन्स वेळेशी झुंज देत आहेत. पुणे...

एकेकाळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेंतर्गत शेकडो महिलांची नावनोंदणी करण्यात मदत करणाऱ्या अंगणवाडी सेविका लता खाडे, आता तिने जी योजना आखली होती...

महाराष्ट्राच्या आत्महत्या पट्ट्यात, विधवांनी एजन्सीवर दावा केला. पुणे बातम्या

ज्योती औसरमल यांनी आपल्या मुलाच्या आणि मुलीच्या शिक्षणासाठी बीड येथे वास्तव्य केले आहे. ती ब्युटीशियन असून घरातूनच कपडे शिवते. तिने डिझायनिंगच्या अभ्यासक्रमासाठीही प्रवेश...

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा पुणे पोलिसांनी वाचवला असा जीव!

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा पुणे पोलिसांनी वाचवला असा जीव! पुणे (शशिकांत पाटोळे) | दि; ८ मार्च २०२६ : पुण्यातील सिंहगड रोड परिसरात एका ३९ वर्षांच्या...

एसपीपीयू चौकातील नवीन उड्डाणपुलाला अजित पवार यांचे नाव देण्यात येणार आहे. पुणे बातम्या

पुणे : गणेशखिंड रोडवरील नव्याने उदघाटन करण्यात आलेल्या एकात्मिक उड्डाणपुलाला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र...

error: Content is protected !!