Homeताज्या बातम्यापुणे शहरात अमलीपदार्थ विरोधी मोहिमेत मोठी कारवाई; परिमंडळ-७ मध्ये ११ आरोपी जेरबंद

पुणे शहरात अमलीपदार्थ विरोधी मोहिमेत मोठी कारवाई; परिमंडळ-७ मध्ये ११ आरोपी जेरबंद

पुणे, दि. २७ एप्रिल २०२६ – पुणे शहर पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी विशेष मोहिमेत परिमंडळ-७ अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली असून विविध पोलीस ठाण्यांच्या विशेष पथकांनी संयुक्तरीत्या धडक मोहिम राबवून तब्बल ११ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात मेफेड्रोन (एम.डी.) व गांजा जप्त करण्यात आला आहे.

पुणे शहर पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशानुसार परिमंडळ-७ हद्दीत दिनांक १७/०४/२०२६ ते २२/०४/२०२६ या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत वाघोली, लोणीकंद, विमानतळ, चंदननगर व हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत विशेष पथके सक्रिय करण्यात आली होती. या पथकांनी स्वतंत्र कारवाया करत अमलीपदार्थ विक्री, साठवण व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली.

तपासादरम्यान काही आरोपी हे बँक ट्रॅन्झॅक्शनद्वारे राजस्थान येथून मेफेड्रोन (एम.डी.) मागवत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी याचा सखोल तपास करून संबंधित पुरावे गोळा केले असून या गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध सुरू आहे. तसेच राजस्थान येथील आरोपींचा मागोवा घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

या मोहिमेत एकूण ११ गुन्हे दाखल करण्यात आले असून ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी एकूण ₹१८,९८,२७०/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ₹१२,९१,४४७/- किमतीचे २६० ग्रॅम एम.डी. ड्रग्ज, तसेच ₹६,०६,८२३/- किमतीचा २० किलो ७५० ग्रॅम वजनाचा गांजा यांचा समावेश आहे. जप्त मुद्देमालाचा पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, तसेच अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-७ श्री. सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या परिसरात कोणीही अमलीपदार्थांची विक्री, साठवण किंवा सेवन करत असल्याचे आढळल्यास त्वरित संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा किंवा नियंत्रण कक्ष टोल फ्री क्रमांक ११२ वर माहिती द्यावी.
पुणे शहर पोलिसांकडून पुढील काळातही अमलीपदार्थ विरोधी मोहिमा अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘त्याने विग घातला होता’: सिया गोयल पुणे पोलिसांना सांगते तिला केतन अग्रवाल का आवडत...

लोहगड किल्ला हत्याकांडात एक धक्कादायक खुलासा झाला कारण आरोपी सिया गोयलने पोलिसांना सांगितले की तिला तिचा मंगेतर केतन अग्रवाल त्याच्या केसांच्या पॅचमुळे आवडत...

‘क्रिकेट मॅचमध्ये गोयल कुटुंबीयांना चेतन चौधरीबद्दल कळले, मग ‘श्रीमंत’ केतन अग्रवालसोबत सियाचे लग्न लावले...

केतन अग्रवाल (एल) आणि त्यांची मंगेतर, सिया गोयल (आर); सीसीटीव्ही फुटेजमध्ये केतनचे शेवटचे क्षण टिपले आहेत. पुणे: सहआरोपी चेतन चौधरीसोबतचे नातेसंबंध समजल्यानंतर आणि...

पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई: काळेपडळमधून सुगंधी गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त, आरोपीला ठोकल्या...

पुणे, दिनांक २६ जून २०२६: महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी गुटखा, सुपारी आणि तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात पुणे शहर पोलिसांच्या काळेपडळ पोलीस...

‘केतनने मला सांगितले की लग्न मोडण्यास उशीर झाला आहे’: पोलिसांनी म्हटले आहे की सिया...

चॅट्स सिया गोयलच्या विधानांच्या विरोधात आहेत, लोणावळा पोलिस म्हणतात लोणावळा: रियाल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे, पोलिसांनी दावा केला...

लोहगड किल्ला खून प्रकरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केतन अग्रवालच्या वडिलांची भेट घेतली, जलदगती...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलदगती न्यायालयाचे आदेश दिले असून धक्कादायक लोहगड किल्ला हत्याकांडप्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली...

error: Content is protected !!