पुणे, दि. ११ एप्रिल २०२६ :
पुणे शहर पोलिसांच्या परिमंडळ-१ अंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत शुक्रवारी (दि. १०/०४/२०२६) सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत व्यापक तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण ४२ सार्वजनिक ठिकाणे, ब्लॅक स्पॉट व मोकळी मैदाने यांची तपासणी करण्यात आली.
फरासखाना, समर्थ, खडक, विश्रामबाग, डेक्कन आणि शिवाजीनगर या पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील मोकळ्या जागा, ब्लॅक स्पॉट व सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली.
कारवाईचा तपशील:
या मोहिमेत भा.न्या.सं. कलम २८५ अन्वये ३ गुन्हे, कोटपा कायद्यानुसार १२ खटले, ट्रिपल सीट कारवाई १ गुन्हे, महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत २२ खटले, एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत २ गुन्हे तर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार ४ गुन्हे दाखल करण्यात आले.
वरिष्ठांचे मार्गदर्शन:
ही कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह-आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा आणि मा. अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) श्री. राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-१ श्री. कृषिकेश रावले यांच्या नेतृत्वात राबविण्यात आली. परिमंडळ-१ मधील सर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























