Homeताज्या बातम्यापुण्यात ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात कडक कारवाई; 229 वाहनचालकांवर गुन्हे, येरवड्यात समुपदेशन...

पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात कडक कारवाई; 229 वाहनचालकांवर गुन्हे, येरवड्यात समुपदेशन सत्र

पुणे | प्रतिनिधी
पुणे शहर वाहतूक शाखेकडून शहरात Drunk & Drive विरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत असून, प्रत्येक शुक्रवार, शनिवार आणि रविवारी कडक कारवाई केली जात आहे. या मोहिमेंतर्गत दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी कोरेगाव पार्क परिसरात 5 ठिकाणी नाकाबंदी करून 31 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
तसेच 12 एप्रिल 2026 रोजी विमानतळ परिसरात 4 ठिकाणी नाकाबंदी लावून 10 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. सर्व विभागांचा एकत्रित विचार करता, पुणे शहरात एकूण 229 वाहनचालकांवर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली.
दरम्यान, 13 एप्रिल 2026 रोजी येरवडा येथील पोलीस उपायुक्त कार्यालय, वाहतूक शाखा येथे या सर्व 229 दोषी वाहनचालकांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. माननीय पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली या चालकांसाठी विशेष समुपदेशन सत्राचे आयोजन करण्यात आले.
या सत्रात मद्यपान करून वाहन चालवल्यामुळे होणारे अपघात, जीवितहानी आणि त्याचे गंभीर परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. “मद्यपान करून वाहन चालविणे म्हणजे स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणे” असा स्पष्ट संदेश पोलिसांनी दिला.
वाहतूक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की,
👉 मद्यपान केल्यास वाहन चालवू नका
👉 पर्यायी वाहनांचा वापर करा
👉 वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करा
पुणे शहरात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचेही संकेत वाहतूक शाखेकडून देण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ऑनलाइन फसवणूक करून महिलेची ९५ हजार रुपयांची फसवणूक. पुणे बातम्या

पुणे : निगडी येथील एका महिलेला ई-कॉमर्स वेबसाइटच्या कस्टमर केअर विभागात तक्रार देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी ९५ हजार रुपयांची फसवणूक केली.26 एप्रिल रोजी महिलेने...

नसरापूर बलात्कार-हत्येतील आरोपी यापूर्वी दोनवेळा लैंगिक गुन्ह्यातून निर्दोष सुटले आहेत. पुणे बातम्या

पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात तीन वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्कार आणि खून प्रकरणातील ६५ वर्षीय आरोपीने यापूर्वी दोनदा लैंगिक गुन्ह्याच्या आरोपांना...

‘लैंगिक गुन्ह्यांचा इतिहास आहे’: पुण्यात 65 वर्षीय व्यक्तीवर बलात्कार, 3 वर्षीय तरुणीच्या हत्येप्रकरणी अटक;...

पुणे - भोर तालुक्यातील नसरापूरजवळ शुक्रवारी दुपारी तीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या कथित बलात्कार आणि हत्येनंतर जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात संताप आणि निदर्शने झाली,...

डी.एस.स्वामी यांनी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला. पुणे बातम्या

नाशिक : डीएस स्वामी यांनी शनिवारी नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक (एसपी) म्हणून पदभार स्वीकारला. ते आउटगोइंग एसपी बाळासाहेब पाटील यांच्यानंतर पोलीस उपायुक्त...

इराणी पिस्त्याचा पुरवठा कमी, पुण्यात भाव ५० टक्क्यांनी वाढले | पुणे बातम्या

पुणे : इराणमधून आयात केलेल्या आणि भारताच्या प्रिमियम ड्रायफ्रूट मार्केटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पिस्त्याचा फेब्रुवारीच्या अखेरीस तुटवडा जाणवत आहे.संपूर्ण शहरातील व्यापाऱ्यांनी नोंदवले...

error: Content is protected !!