Homeताज्या बातम्या“बाजीराव रोडवर झाडांची हत्या? सिमेंट टाकून कत्तलीचा प्लॅन उघड!”

“बाजीराव रोडवर झाडांची हत्या? सिमेंट टाकून कत्तलीचा प्लॅन उघड!”

पुणे | प्रतिनिधी
पुण्यातील गजबजलेल्या बाजीराव रोड परिसरात, BSNL ऑफिसच्या समोर ज्ञानेश्वर हॉटेल व राजेश्वर हॉटेल समोर असलेल्या झाडांबाबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. झाडांना पाणी देण्यासाठी असलेल्या जागेत सिमेंटचा कोबा (काँक्रिट कव्हर) करण्यात येत असून, यामागे झाडांची नैसर्गिक वाढ रोखून त्यांची हळूहळू कत्तल करण्याचे नियोजन असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, झाडांच्या मुळांभोवती पूर्णपणे सिमेंट टाकल्याने माती, पाणी व हवा यांचा प्रवाह बंद होतो, ज्यामुळे झाडे हळूहळू सुकतात. संबंधित ठिकाणी असेच काम सुरू असल्याचे दिसून येत असून, यामुळे पर्यावरणप्रेमी व नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या संदर्भात संजय आनंद बावळेकर (मो. 9850422707) यांनी अधिकृत तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे.
नियमांनुसार, झाडांच्या भोवती किमान मोकळी जागा ठेवणे बंधनकारक असताना, येथे मात्र संपूर्ण परिसर सिमेंटने बंद करण्यात येत असल्याचे फोटोमधून स्पष्ट होते. हा प्रकार पुणे महानगरपालिकेच्या गार्डन विभागाच्या नियमांचे उल्लंघन असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नागरिकांनी या प्रकाराची तात्काळ चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, तसेच झाडांच्या संरक्षणासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. अन्यथा, हा प्रकार शहरातील हरित संपत्तीवर मोठा घाला ठरू शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘लैंगिक गुन्ह्यांचा इतिहास आहे’: पुण्यात 65 वर्षीय व्यक्तीवर बलात्कार, 3 वर्षीय तरुणीच्या हत्येप्रकरणी अटक;...

पुणे - भोर तालुक्यातील नसरापूरजवळ शुक्रवारी दुपारी तीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या कथित बलात्कार आणि हत्येनंतर जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात संताप आणि निदर्शने झाली,...

डी.एस.स्वामी यांनी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला. पुणे बातम्या

नाशिक : डीएस स्वामी यांनी शनिवारी नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक (एसपी) म्हणून पदभार स्वीकारला. ते आउटगोइंग एसपी बाळासाहेब पाटील यांच्यानंतर पोलीस उपायुक्त...

इराणी पिस्त्याचा पुरवठा कमी, पुण्यात भाव ५० टक्क्यांनी वाढले | पुणे बातम्या

पुणे : इराणमधून आयात केलेल्या आणि भारताच्या प्रिमियम ड्रायफ्रूट मार्केटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पिस्त्याचा फेब्रुवारीच्या अखेरीस तुटवडा जाणवत आहे.संपूर्ण शहरातील व्यापाऱ्यांनी नोंदवले...

बाणेर आणि बालेवाडीत टाकलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली ‘स्मार्ट’ टॅग हरवला. पुणे बातम्या

पुणे: एकेकाळी 'स्मार्ट सिटी' झोन म्हणून ओळखले जाणारे बाणेर-बालेवाडी आता स्मार्ट, अवाजवी कचरा, अस्ताव्यस्त कचरा उचलणे आणि आगीच्या भक्ष्यस्थानी जाणाऱ्या कचऱ्याच्या धूराने भरलेल्या रस्त्यांशिवाय...

उपग्रह आणि ग्राउंड डेटा वापरून अंदाज अचूकता सुधारण्यासाठी IITM-ISRO टाय-अप | पुणे बातम्या

पुणे: भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था आणि इस्रोच्या स्पेस ऍप्लिकेशन्स सेंटर यांच्यातील सहकार्याचा उद्देश भू-आधारित मोजमापांसह उपग्रह निरीक्षणे एकत्रित करून हवामान अंदाजांची अचूकता...

error: Content is protected !!