Homeताज्या बातम्यापोलिस प्रशासनाची, सरकारची, फसवणूक केल्याबद्दल फिर्यादी व आ सावंत यांच्यावर गुन्हा दाखल...

पोलिस प्रशासनाची, सरकारची, फसवणूक केल्याबद्दल फिर्यादी व आ सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करावा. – शिवसेना पुणे .

पोलिस प्रशासनाची, सरकारची, फसवणूक केल्याबद्दल फिर्यादी व आ सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करावा. – शिवसेना पुणे . 

पुणे:- आ तानाजी सावंत यांच्या विरोधात शिवसेना पुणे शहराच्या वतीने सिंहगड पोलिस स्टेशन येथे तक्रार देण्यात आली. पोलिस प्रशासन आणि महाराष्ट्राचे सरकार एका आमदार पुत्राला शोधण्यासाठी किती तत्परतेने काम करते हे महाराष्ट्राने पाहिले. परंतू हीच तत्परता सर्वसामान्य माणसाच्या अडचणीच्या वेळी देखील असावी, अशी आशा आज प्रत्येक नागरिकांना आहे. आ तानाजी सावंत यांचा मुलगा कुटुंबातील भांडणामुळे घरी कोणालाही न सांगता बॅंकॉकला जात असताना, आणि मुलगा काॅलेज कॅम्पस मधून स्विफ्ट गाडीत गेल्याचे समजले असताना देखील पुण्यात आ सावंत आणि कुटुंबियांनी मुलाचे अपहरण नाट्य घडवून आणले, पोलिसांनीही त्यावर तत्परतेने भूमिका बजावली. त्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन. परंतू त्यासोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, केंद्रिय हवाई उड्डाण राज्यमंत्री यांनी देखील तातडीने सूत्र हलवली. पण हा सगळा बनाव असल्याचे उघड झाले. आणि आमदार सावंतांचा मुलगा खाजगी विमानाने दोन मित्रांसोबत बॅंकॉकला गेल्याचे समोर आले. यासर्व प्रकारामुळे महाराष्ट्रात सरकार व पोलिस प्रशासन यावर टीकेची झोड उठली, आमदारांनी पदाचा गैरवापर करून पोलिस यंत्रणा मुलाच्या शोधकार्यात लावली. स्वतःची राजकीय ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला गेला, त्यामुळे सरकारी यंत्रणेवर झालेला खर्च आमदार सावंतांकडून वसूल करावा तसेच पोलिस प्रशासन, आणि महाराष्ट्र सरकारची दिशाभूल केल्याबद्दल फिर्यादी जो महाविद्यालयाचा विश्वस्त आहे. आणि विश्वस्तांवर ज्यांनी फिर्याद देण्याचे फर्मान सोडले त्या आमदार सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. असे पुणे शहर शिवसेनेकडून सिंहगड पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, राज्य संघटक वसंत मोरे, उपशहर प्रमुख भरत कुंभारकर, महिला आघाडीच्या रेखा कोंडे, शहर संघटक संतोष गोपाळ , प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, विभाग प्रमुख राजू चव्हाण, अनिल माझिरे, अजय परदेशी, संतोष सावंत, शिवा पासलकर, प्रसाद गिजरे, विलास पवार, संजय साळवी, प्रणव अडकर, नितीन जगताप, मंगेश रासकर, मच्छिंद्र खोमणे, उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उदयपूर फाईल्स’ चित्रपटावर दिल्ली उच्च न्यायालयाची स्थगिती – सामाजिक सलोख्यासाठी अन्वर शेख यांची याचिका...

📰 प्रेस प्रकाशन ‘उदयपूर फाईल्स’ चित्रपटावर दिल्ली उच्च न्यायालयाची स्थगिती – सामाजिक सलोख्यासाठी अन्वर शेख यांची याचिका ठरली निर्णायक पुणे | 11 July 2025 विवादग्रस्त ‘उदयपूर...

बोट व्हॅलर वॉच 1 जीपीएस 15 दिवसांपर्यंत बॅटरीच्या आयुष्यासह भारतात लाँच केले गेले: किंमत,...

शुक्रवारी भारतात बोट व्हॅलर वॉच 1 जीपीएस सुरू करण्यात आले. स्मार्टवॉच हे बोटच्या नवीन शौर्य लाइनअपमधील पहिले उत्पादन आहे. त्याच्या नावाप्रमाणेच, ते इनबिल्ट जीपीएस...

मंचरमध्ये महिला पत्रकारावर हल्ला – (अर्थात) पंजेतन पवित्र संघटनेचा तीव्र निषेध

! पुणे | क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज दिनांक ०८ जुलै २०२५ रोजी मंचर येथे बातमी कव्हर करत असलेल्या महिला पत्रकार सौ. निता मोकल यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी...

हर्षदा भिसे हिची पाचवी स्कॉलरशिप गुणवत्ता यादीसाठी निवड ✨

– जिल्हास्तरीय यशाची खोसपुरीत दणदणीत नोंद! प्रतिनिधी – शिवाजी दवणे, जिल्हा उपसंपादक (Mob: 9730170965) अहिल्यानगर तालुक्यातील खोसपुरी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी कु. हर्षदा देवीदास भिसे...

पुण्याच्या स्वच्छतेसाठी आयुक्तांचा मध्यरात्री दौरा!

पुण्याच्या स्वच्छतेसाठी आयुक्तांचा मध्यरात्री दौरा! पुणे शहराच्या स्वच्छतेसाठी पुणे महापालिकेकडून रात्रपाळीतही मोठ्या प्रमाणावर काम सुरू असून, याचा आढावा घेण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे मा. आयुक्त नवल किशोर...

error: Content is protected !!