Homeताज्या बातम्या“संघटनच शिवसेनेची ताकद; पुण्यात ‘मिसिंग लिंक’ जोडण्याचे राऊतांचे आवाहन” शिवसेना...

“संघटनच शिवसेनेची ताकद; पुण्यात ‘मिसिंग लिंक’ जोडण्याचे राऊतांचे आवाहन” शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात लवकरच शहर नेतृत्व फेरबदल.

पुणे, दि. 29 – शिवसेना ही केवळ सत्तेवर अवलंबून नसून तिची खरी ताकद संघटनात आहे, त्यामुळे पक्ष पराभूत होत नाही आणि पुन्हा सत्तेत येण्याची क्षमता राखतो, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
पुण्यातील बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना तळागाळात काम मजबूत करण्याचे आवाहन केले तसेच लवकरच शिवसेना पुणे शहरात पक्षीय स्तरावर बदल करण्याचे भाकीत देखील केले.

महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्ष सोडून गेलेल्या बहुतांश नगरसेवकांचा पराभव झाल्याचा उल्लेख करत, “मिसिंग लिंक” शोधून जनतेशी पुन्हा नाळ जोडण्यावर त्यांनी भर दिला. येत्या काळात निवडणुका नसल्याने संघटन विस्तारासाठी ही संधी असल्याचेही त्यांनी सांगितले.

सचिन अहिर यांनी पुण्यातील निवडणुकीत पॅनेल पद्धतीचा फटका आपल्याला बसल्याचे मान्य करत, कार्यकर्त्यांनी जिद्दीने काम करण्याचे आवाहन केले. तर वसंत मोरे यांनी मतांची घट असूनही मिळालेला पाठिंबा सकारात्मक असल्याचे सांगितले.
शहरप्रमुख संजय मोरे यांनी पक्ष वाढीसाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्नशील आहोत आणि नव्या जोमाने कामाला लागू असे सांगितले.

दरम्यान, पश्चिम बंगाल संदर्भात बोलताना राऊत यांनी भाजपवर टीका करत तृणमूल काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीचा उल्लेख केला आणि तेथे भाजपला पराभवाचा सामना करावा लागेल, असा दावा केला.
यावेळी व्यासपीठावर शिवसेना खासदार संजय राऊत, संपर्क प्रमुख सचिन अहिर, माजी आमदार महादेव बाबर, राज्य संघटक वसंत मोरे , शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, आणि युवासेना पदाधिकारी तसेच प्रमुख शिवसैनिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई: काळेपडळमधून सुगंधी गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त, आरोपीला ठोकल्या...

पुणे, दिनांक २६ जून २०२६: महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी गुटखा, सुपारी आणि तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात पुणे शहर पोलिसांच्या काळेपडळ पोलीस...

‘केतनने मला सांगितले की लग्न मोडण्यास उशीर झाला आहे’: पोलिसांनी म्हटले आहे की सिया...

चॅट्स सिया गोयलच्या विधानांच्या विरोधात आहेत, लोणावळा पोलिस म्हणतात लोणावळा: रियाल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे, पोलिसांनी दावा केला...

लोहगड किल्ला खून प्रकरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केतन अग्रवालच्या वडिलांची भेट घेतली, जलदगती...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलदगती न्यायालयाचे आदेश दिले असून धक्कादायक लोहगड किल्ला हत्याकांडप्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली...

​कर्बलाच्या शहीदांच्या स्मरणार्थ एकतेची मिसाल: मोहरमच्या रात्री पुण्यात सरबतासाठी मोफत साखर वाटप

​पुणे, दि. २५ जून २०२६: मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना 'मोहरम'च्या नवव्या दिवशी, म्हणजेच 'कत्तलची रात्र' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रात्री, 'पंजेतन पवित्र संघटना, महाराष्ट्र राज्य' यांच्या...

मुंबई लोकल हत्या: ‘सोशल मीडिया ट्रायल’मुळे आमच्या आयुष्यावर, नोकऱ्यांवर परिणाम; असे आरोपीच्या कुटुंबीयांचे म्हणणे...

सोशल मीडिया ट्रायलमुळे आमचे जीवन आणि नोकऱ्यांवर परिणाम होत आहे, असे मुंबई लोकल ट्रेनवर चाकूहल्ला करणाऱ्या आरोपीचे नातेवाईक म्हणतात मुंबई: मुंबई लोकल ट्रेनमध्ये...

error: Content is protected !!