Homeताज्या बातम्या'बंगालला काबाची भूमी बनू देणार नाही' या विधानावरून संताप; उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर...

‘बंगालला काबाची भूमी बनू देणार नाही’ या विधानावरून संताप; उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर कारवाईसाठी मा. हनीफ र. शेख यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपतींना निवेदन

पुणे:
पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचारसभेत उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी “बंगालच्या भूमीला काबाची भूमी बनू देणार नाही” असे जे विधान केले आहे, त्यावरून मुस्लिम समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रक्षोभक विधानामुळे सामाजिक सलोखा धोक्यात आल्याचा आरोप करत, पंजेतन पवित्र संघटनेच्या वतीने उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

​या संदर्भात संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. हनीफ र. शेख यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यामार्फत भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान कार्यालय आणि संसद भवनाला विशेष निवेदन पाठवण्यात आले आहे.
​नेमके प्रकरण काय?
​सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, पश्चिम बंगालमधील एका निवडणूक प्रचार सभेत बोलताना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी “बंगालची धरती काबेची धरती बनू देणार नाही” असे विधान केले आहे. या विधानामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून देशात जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
​भावना दुखावल्याचा आरोप
​निवेदनात म्हटले आहे की, ‘काबा शरीफ’ हे जगभरातील कोट्यवधी मुस्लिम बांधवांचे अत्यंत पवित्र धार्मिक स्थळ आहे. दरवर्षी लाखो नागरिक हज यात्रेसाठी तेथे जातात. अशा पवित्र स्थळाचा राजकीय भाषणात अवमानकारक उल्लेख करून समाजात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची भावना जनसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे.
​कायदेशीर कारवाईची मागणी
​भारत हा सर्वधर्मसमभाव मानणारा लोकशाही देश आहे. अशा जबाबदार घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने चिथावणीखोर भाषा वापरणे हे निषेधार्ह आहे. या निवेदनाद्वारे खालील मागण्या करण्यात आल्या आहेत:
​सदर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.
​संबंधित विधान कायद्याच्या विरोधात आढळल्यास, भारतीय दंड संहिता (IPC) व इतर लागू कायद्यांनुसार गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी.
​देशातील जनतेसमोर ‘कायदा सर्वांसाठी समान आहे’ हा संदेश जावा.
​यावेळी पंजेतन पवित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. सोहेल शेख आणि सहसंचालक मा. सुरज भगत यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. या गंभीर विषयाची दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी अपेक्षा संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

​पुणे पोलिसांचा ‘ड्रग्ज मुक्त पुणे’ संकल्प; ‘ड्रग्ज फ्री पुणे’ मोबाईल ॲपचे अनावरण ​पुणे:

पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्तालय, परिमंडळ-२ आणि पुणे महानगरपालिका प्रभाग क्र. २० व २१ यांच्या संयुक्त विद्यमाने 'ड्रग्ज मुक्त प्रभाग व ड्रग्ज मुक्त पुणे' या...

“संघटनच शिवसेनेची ताकद; पुण्यात ‘मिसिंग लिंक’ जोडण्याचे राऊतांचे आवाहन” शिवसेना उद्धव बाळासाहेब...

पुणे, दि. 29 – शिवसेना ही केवळ सत्तेवर अवलंबून नसून तिची खरी ताकद संघटनात आहे, त्यामुळे पक्ष पराभूत होत नाही आणि पुन्हा सत्तेत येण्याची...

न्यायालयातील साक्षीदारांना आरोपींकडून धमकावण्याचा प्रकार; ‘जागरूक नागरिक विकास मंच’ची प्रधान न्यायाधीशांकडे तक्रार

​पुणे: पुणे जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रलंबित फौजदारी खटल्यातील साक्षीदारांना वृत्तपत्रांच्या माध्यमातून आणि प्रशासकीय दबावाचा वापर करून धमकावले जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे....

पुणे पोलीस छापा: फरासखाना आणि खडक पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी रात्रीच्या वेळी कारवाई करताना.

पुणे: पुणे शहर पोलिसांनी बुधवार पेठेतील कुंटणखान्यांवर मोठी कारवाई करत अवैधरीत्या भारतात वास्तव्यास असलेल्या आणि वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या बांगलादेशी नागरिकांची सुटका केली आहे. या...

पुणे: फुलचंद पानात नशकरीता वापरल्या जाणाऱ्या अंमली गोळ्यांचा साठा जप्त; शिवजीनगर पोलिसांनी आरोपीला केले...

पुणे: पुणे शहर पोलिसांनी अंमली पदार्थांविरुद्ध चालवलेल्या मोहिमेअंतर्गत एक मोठी कारवाई केली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी एका कारवाईत प्रतिबंधित मादक गोळ्यांची विक्री करणाऱ्या एका आरोपीला अटक...

error: Content is protected !!