Homeक्राईमप्रवासाच्या बहाण्याने चारचाकी गाडीत बसून चालकाला मारहाण करीत त्यांचा खून करणाऱ्या सराईत...

प्रवासाच्या बहाण्याने चारचाकी गाडीत बसून चालकाला मारहाण करीत त्यांचा खून करणाऱ्या सराईत आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) व आळेफाटा पोलिसांनी आवळल्या

आळेफाटा (पुणे): प्रवासाच्या बहाण्याने चारचाकी गाडीत बसून चालकाला मारहाण करीत त्यांचा खून करणाऱ्या सराईत आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) व आळेफाटा पोलिसांनी आवळल्या आहेत.शुक्रवारी (ता. 31) माळशेज घाटाजवळ सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.विशाल आनंदा चव्हाण (वय -22, रा. गंगापूर रोड, बिगबाजार बँकसाईट, महेश अपार्टमेंट कॉलेज रोड, नाशिक), मयुर विजय सोळसे (वय – 23 गंगापूर रोड, गोकुळवाडी, श्रीरंगनगर, नाशिक), ऋतुराज विजय सोनवणे (वय 21, रा. गंगापूर रोड, विदया विकास सर्कल, गोकुळवाडी, नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. तर राजेश बाबुराव गायकवाड (वय 56, व्यवसाय चालक रा. निधी अपार्टमेंट जेलरोड, नाशिक, ता. जि. नाशिक) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर सदरचे आरोपी हे सराईत असून आरोपी विशाल चव्हाण व मयुर सोळसे यांच्यावर गंगापूर (नाशिक) पोलीस ठाण्यात अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. तसेच त्यांचा साथीदार आरोपी युवराज मोहन शिंदे याच्यावर चार गुन्हे दाखल आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजेश गायकवाड यांचा मंगळवारी (ता. 28) खून झाला होता. याप्रकरणी त्यांचा मुलगा अंकुश गायकवाड यांनी फिर्याद दिली होती. सोमवारी राजेश गायकवाड हे कार घेऊन रविवारी पुण्याला गेले होते. संध्याकाळी त्यांनी ते पुणे-नाशिक हायवेलगत असलेल्या संतवाडी येथील समाघेऊन रविवारी पुण्याला गेले होते. संध्याकाळी त्यांनी ते पुणे-नाशिक हायवेलगत असलेल्या संतवाडी येथील समाधान हॉटेल येथे असल्याची माहिती कुटुंबाला दिली होती. मात्र दुसऱ्या ते दिवशी घरी न आल्याने कुटुंबाने मिसींग केस दाखल केली होती.

मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास संतवाडी परिसरात राजेश गायकवाड यांचा मृतदेह मिळून आला. यावेळी त्यांचे दोन्ही हात पाठीमागे बांधलेले होते. सदर परिस्थीतीवरून वरील प्रमाणे अनोळखी व्यक्ती विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला होता. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना अधीक्षक देशमुख यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आळेफाटा पोलिसांच्या तपास पथकाच्या मदतीने तपास सुरू करून मृतदेह मिळून आलेल्या रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले.

 

तपासादरम्यान राजेश गायकवाड यांची कार चाळकवाडी टोलनाक्यावरून नाशिककडे जाताना कारमध्ये त्यांच्या व्यतिरीक्त आणखी दोन इसम बसलेले होते. त्यातील एका व्यक्तीच्या डोक्यात पांढऱ्या रंगाची कॅप होती. त्याद्वारे चाकण चौकातील नाशिककडे जाणाऱ्या गाडीतळावर जावून चौकेली असता, पांढऱ्या रंगाची कॅप घातलेल्या इसमासोबत इतर तीन व्यक्ती असल्याचे आढळून आले. सदर घटनेची माहिती एका खबऱ्याकडून घेऊन सदर फुटेजमधील व्यक्ती या युवराज मोहन शिंदे ( रा. सातपूर जि. नाशिक) व विशाल आनंदा चव्हाण (रा. गंगापूर-कॉलेज रोड, नाशिक) हे असून त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सदरचे आरोपी पुन्हा गुन्हा करण्यासाठी कल्याण बाजूकडून ओतूर बाजुकडे येत असल्याची माहिती मिळाली.

 

दरम्यान, माळशेज घाटाजवळ सापळा रचून वरील तीन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता, ते नाशिकला जाण्यासाठी प्रवासी म्हणून कारमध्ये बसले आणि आळेफाट्याजवळ राजेश गायकवाड यांचा कारमध्येच गळा आवळून खून केला. त्यांचा मृतदेह तिथेच टाकून कार घेऊन निघून गेले असल्याची माहिती दिली. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, यातील मुख्य आरोपी युवराज शिंदे यायापुर्वी त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने अशा प्रकारच्या पद्धतीचा अवलंब करून एक इरटीगा कार जबरदस्तीने चोरून नेली. त्याबाबत चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता शुक्रवारपर्यंत (ता. 07) पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

 

सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर, यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, आळेफाटा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक अमित सिदपाटील, आळेफाटाचे सहायक निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर डुंबरे, गुन्हे शाखेचे अंमलदार दिपक साबळे, राजु मोमीण, संदिप वारे, अक्षय नवले, विक्रम तापकीर, निलेश सुपेकर, आळेफाटाचे अंमलदार विनोद गायकवाड, अमित माळुंजे, सचिन कोबल, गणेश जगताप, ओकार खुणे, यांनी केली आहे.नेकशीधान

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.74e22517.1762832971.3abd1d77 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.74e22517.1762814924.3a1751db Source link

दिल्लीमध्ये भीषण स्फोट; 8 जणांचा मृत्यू, मुंबई-पुण्यात हाय अलर्ट

दिल्लीमध्ये भीषण स्फोट; 8 जणांचा मृत्यू, मुंबई-पुण्यात हाय अलर्ट 📍 नवी दिल्ली : आज सकाळी सुमारे 10:45 वाजता दिल्लीच्या करोलबाग परिसरातील एका व्यावसायिक इमारतीत भीषण स्फोट...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.74e22517.1762796870.37e91c13 Source link

पुण्यात गुटखा विक्रीवर पोलीस आयुक्तांचे आदेश — तरीही खुलेआम विक्री सुरूच!

पुणे (प्रतिनिधी: आमिर मोहम्मद शेख) महाराष्ट्र शासनाने गुटखा, मावा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांवर राज्यभर संपूर्ण बंदी लागू केली आहे. या बंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.74e22517.1762832971.3abd1d77 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.74e22517.1762814924.3a1751db Source link

दिल्लीमध्ये भीषण स्फोट; 8 जणांचा मृत्यू, मुंबई-पुण्यात हाय अलर्ट

दिल्लीमध्ये भीषण स्फोट; 8 जणांचा मृत्यू, मुंबई-पुण्यात हाय अलर्ट 📍 नवी दिल्ली : आज सकाळी सुमारे 10:45 वाजता दिल्लीच्या करोलबाग परिसरातील एका व्यावसायिक इमारतीत भीषण स्फोट...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.74e22517.1762796870.37e91c13 Source link

पुण्यात गुटखा विक्रीवर पोलीस आयुक्तांचे आदेश — तरीही खुलेआम विक्री सुरूच!

पुणे (प्रतिनिधी: आमिर मोहम्मद शेख) महाराष्ट्र शासनाने गुटखा, मावा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांवर राज्यभर संपूर्ण बंदी लागू केली आहे. या बंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी...
error: Content is protected !!