बाल विद्यामंदिर या शाळेमध्ये सर्पमित्र कृष्णकांत रामदास पोपळघट यांचे व्याख्यान
सहसंपादक शिवाजी दवणे
क्राईम महाराष्ट्र न्यूज 9730170965. साप हा शब्द उच्चारला किंवा दिसला तरी कोणाच्याही मनामध्ये एकदम भीती बसते. नागपंचमी या सणाचे औचित्य साधून राहुरीच्या बाल विद्या मंदिर या शाळेमध्ये
सर्पमित्र श्री.कृष्णा रामदास पोपळघट यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. साप हा निसर्गातील अन्नसाखळीतील अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे. अनेक साप हे बिनविषारी असतात परंतु शेतकरी माहिती अभावी भीतीपोटी त्याला मारून टाकतात. वास्तविक पाहता साप शेतात पिकांची नासाडी करणाऱ्या उंदराला खाऊन आपली उपजीविका करत असतो. तो खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा मित्रच असतो. अनेकदा सापाच्या विषाचा उपयोग अनेक औषधांमध्ये देखील केला जातो. सापाच्या विषारी
बिनविषारी अशा अनेक प्रजातीची माहिती श्री . कृष्णा पोपळघट यांनी दिली.साप दिसल्यास त्याला लगेच मारून न टाकता त्यांना सुरक्षितपणे जाण्याची संधी द्यावी किंवा सर्पमित्राला बोलवावे असे आवाहन राहुरी येथील सुप्रसिद्ध सर्प मित्र श्री. कृष्णा पोपळघट व श्री मुजीब देशमुख यांनी केले. सर्पदंशाच्या घटना टाळण्यासाठी व सर्पदंश झाल्यानंतर कोणते प्रथमोपचार करावे याविषयी ची माहिती विद्यार्थ्यांना यावेळी देण्यात आली.बिन विषारी वाडा, धामण, तस्कर ,कवड्या, गवत्या, मांडूळ ,अजगर वेरूळ, कुकरी, रुका, तर विषारी असलेले नाग, मण्यार ,घोणस, पोवळा ,फुरसे, किंग कोब्रा या सापांविषयी ची माहिती ऐकून संपूर्ण पालक मंत्रमुग्ध झाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय देतानाश्री संदीप रासकर सर यांनी श्री. कृष्णा पोपळघट हे गेली वीस वर्षापासून राहुरी शहर व परिसरातील मध्ये सर्पमित्र म्हणून मोठे योगदान देत आहे याचा विशेष उल्लेख केला. कार्यक्रमानंतर कृष्णा पोपळघट यांचा ऑटोग्राफ घेण्यासाठी विद्यार्थ्यांची एकच झुंबड उडाली. छोट्याशा मुलांनी त्यांना एका मोठ्या सेलिब्रिटी सारखे सन्मान दिला त्याबद्दल श्री कृष्णा पोपळघट यांनी धन्यवाद मानले. अध्यक्षस्थानी कै. लालशेठ बिहानी विद्या मंदिर प्रशालेचे माध्यमिक विभागाचे ज्येष्ठ शिक्षक श्री राहुल जगताप हे उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी बाल विद्या मंदिर चे मुख्याध्यापक श्री गुलाब मोरे सर, सर्व शिक्षकवृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आभार प्रदर्शन श्री.शिवाजी कवडे सर यांनी केले.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























