Homeताज्या बातम्याबाल विद्यामंदिर या शाळेमध्ये सर्पमित्र कृष्णकांत रामदास पोपळघट यांचे व्याख्यान

बाल विद्यामंदिर या शाळेमध्ये सर्पमित्र कृष्णकांत रामदास पोपळघट यांचे व्याख्यान

सहसंपादक शिवाजी दवणे
क्राईम महाराष्ट्र न्यूज 9730170965.
साप हा शब्द उच्चारला किंवा दिसला तरी कोणाच्याही मनामध्ये एकदम भीती बसते. नागपंचमी या सणाचे औचित्य साधून राहुरीच्या बाल विद्या मंदिर या शाळेमध्ये
सर्पमित्र श्री.कृष्णा रामदास पोपळघट यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. साप हा निसर्गातील अन्नसाखळीतील अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे. अनेक साप हे बिनविषारी असतात परंतु शेतकरी माहिती अभावी भीतीपोटी त्याला मारून टाकतात. वास्तविक पाहता साप शेतात पिकांची नासाडी करणाऱ्या उंदराला खाऊन आपली उपजीविका करत असतो. तो खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा मित्रच असतो. अनेकदा सापाच्या विषाचा उपयोग अनेक औषधांमध्ये देखील केला जातो. सापाच्या विषारी बिनविषारी अशा अनेक प्रजातीची माहिती श्री . कृष्णा पोपळघट यांनी दिली.साप दिसल्यास त्याला लगेच मारून न टाकता त्यांना सुरक्षितपणे जाण्याची संधी द्यावी किंवा सर्पमित्राला बोलवावे असे आवाहन राहुरी येथील सुप्रसिद्ध सर्प मित्र श्री. कृष्णा पोपळघट व श्री मुजीब देशमुख यांनी केले. सर्पदंशाच्या घटना टाळण्यासाठी व सर्पदंश झाल्यानंतर कोणते प्रथमोपचार करावे याविषयी ची माहिती विद्यार्थ्यांना यावेळी देण्यात आली.बिन विषारी वाडा, धामण, तस्कर ,कवड्या, गवत्या, मांडूळ ,अजगर वेरूळ, कुकरी, रुका, तर विषारी असलेले नाग, मण्यार ,घोणस, पोवळा ,फुरसे, किंग कोब्रा या सापांविषयी ची माहिती ऐकून संपूर्ण पालक मंत्रमुग्ध झाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय देतानाश्री संदीप रासकर सर यांनी श्री. कृष्णा पोपळघट हे गेली वीस वर्षापासून राहुरी शहर व परिसरातील मध्ये सर्पमित्र म्हणून मोठे योगदान देत आहे याचा विशेष उल्लेख केला. कार्यक्रमानंतर कृष्णा पोपळघट यांचा ऑटोग्राफ घेण्यासाठी विद्यार्थ्यांची एकच झुंबड उडाली. छोट्याशा मुलांनी त्यांना एका मोठ्या सेलिब्रिटी सारखे सन्मान दिला त्याबद्दल श्री कृष्णा पोपळघट यांनी धन्यवाद मानले. अध्यक्षस्थानी कै. लालशेठ बिहानी विद्या मंदिर प्रशालेचे माध्यमिक विभागाचे ज्येष्ठ शिक्षक श्री राहुल जगताप हे उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी बाल विद्या मंदिर चे मुख्याध्यापक श्री गुलाब मोरे सर, सर्व शिक्षकवृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आभार प्रदर्शन श्री.शिवाजी कवडे सर यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमानतळ रोडवरील ‘बॅक बेंचर हॉटेल’वर मोठी कारवाई; ३० जण ताब्यात, मद्यसाठा व म्युझिक सिस्टीम...

​पुणे पोलिसांचे 'मिशन क्रॅकडाऊन' सुरूच: विमानतळ रोडवरील 'बॅक बेंचर हॉटेल'वर मोठी कारवाई; ३० जण ताब्यात, मद्यसाठा व म्युझिक सिस्टीम जप्त ​पुणे (प्रतिनिधी): पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या...

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये नागरिक–पोलीस स्रेहसंमेलन: ध्वनी प्रदूषण नियंत्रणाबद्दल आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार

पुणे: नागरिक आणि पोलीस यांच्यातील विश्वास, सहकार्य आणि परस्पर सन्मानाचे सुंदर उदाहरण म्हणून कल्याणी नगर येथील रहिवाशांनी, मोनिका शर्मा व त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली, येरवडा...

पुणे रेल्वे स्टेशनवर सीसीटीसीवर चाकूने प्राणघातक हल्ला करून जबरी चोरी; १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने...

पुणे: पुणे रेल्वे स्टेशन येथील सिनियर बुकिंग क्लर्क (सीसीटीसी) यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करून रोख रक्कम, मोबाईल व सोन्याची चैन जबरीने चोरी करणाऱ्या तीन आरोपींना...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात रवानगी ​शिक्रापूर / पुणे : शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत...

error: Content is protected !!