Homeताज्या बातम्याकोथरूड पोलिसांची धडक कारवाई: विक्रीसाठी आणलेली २ पिस्तुले आणि २ जिवंत काडतुसांसह...

कोथरूड पोलिसांची धडक कारवाई: विक्रीसाठी आणलेली २ पिस्तुले आणि २ जिवंत काडतुसांसह एकास अटक; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

​पुणे:
कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीररीत्या पिस्तूल विक्रीसाठी आणणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. आरोपीकडून २ पिस्तुले आणि २ जिवंत काडतुसे असा एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
​कारवाईचा तपशील
दिनांक १९ ऑगस्ट २०२६ रोजी कोथरूड पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार शकील पठाण व शिवप्रसाद दहिफळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, केळेवाडी येथील कुमार प्रॉपर्टीजच्या मोकळ्या जागेत पंपिंग स्टेशनपासून काही अंतरावर पांढऱ्या रंगाचा शर्ट व ब्लू जीन्स घातलेला एक तरुण कमरेला पाठीमागे पिस्तूल लावून संशयास्पदरीत्या थांबलेला आहे.
​सदर माहिती प्राप्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांना अवगत करण्यात आले. त्यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर घुले, पोलीस अंमलदार शकील पठाण, राजेंद्र लांडगे, ऋषीकेश कोळप, वैभव शितकाल व पंचांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन संशयित इसमाला ताब्यात घेतले.
​आरोपीची माहिती व जप्त मुद्देमाल
ताब्यात घेतलेल्या इसमाची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव प्रेम देवेंद्र साळुंखे (वय २१ वर्षे, रा. स.नं. ३५१, म्हसोबा चौक, दत्तवाडी, पुणे) असे सांगितले. पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीत त्याच्या कमरेला २ देशी पिस्तुले व खिशात २ जिवंत काडतुसे (राऊंड) मिळून आली. चौकशीदरम्यान ही शस्त्रे विक्रीसाठी आणल्याचे आरोपीने कबूल केले. पोलिसांनी १,५०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
​गुन्हा नोंद व पुढील तपास
या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात आरोपी प्रेम देवेंद्र साळुंखे याच्याविरुद्ध गु.र.नं. ३३८/२०२६, आर्म ॲक्ट कलम ३ (२५) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर घुले करत आहेत.
​कारवाईतील पोलीस पथक व अधिकारी
सदरची कामगिरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:
​मार्गदर्शक वरिष्ठ अधिकारी: मा. अप्पर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) श्री. राजेश बनसोडे, मा. प्रभारी पोलीस उपआयुक्त (परिमंडळ ०३) श्री. मिलींद मोहिते, मा. पोलीस उपआयुक्त (परिमंडळ ०३) श्री. सागर कवडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (कोथरूड विभाग) श्रीमती सुजाता तानवडे.
​मार्गदर्शक पोलीस निरीक्षक: वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके (कोथरूड पोलीस ठाणे), पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल कारोटे.
​तपास व कारवाई पथक: तपास पथक अधिकारी सपोनि सुधीर घुले, पोलीस अंमलदार दत्तात्रय सोनवणे, राजेंद्र लांडगे, श्रीकांत दगडे, शकील पठाण, शिवप्रसाद दहिफळे, मयुर पांढरे, वैभव शितकाल, गणेश डोंगरे, ऋषीकेश कोळप आणि आकाश वाल्मिकी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात पोलिसांवर हल्ला करून फरार झालेल्या दरोडेखोरांना छत्रपती संभाजीनगरच्या जंगलातून अटक; गुन्हे शाखा युनिट-५...

पुणे: डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीट मार्शलवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोन सराईत दरोडेखोरांना पुणे शहर गुन्हे शाखा...

कल्याणीनगर ट्रम्प टॉवरसमोर जबरी चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना येरवडा पोलिसांकडून अटक; ६० हजारांचा...

पुणे: कल्याणीनगर येथील ट्रम्प टॉवरसमोर फोनवर बोलत थांबलेल्या नागरिकाला "रागाने का पाहतोस" असे म्हणून जीवे मारण्याची धमकी देत रोख रक्कम लुटणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना येरवडा...

जास्त परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या महिलेला बेळगावातून अटक; शिवाजीनगर पोलिसांची कारवाई

​पुणे: गुंतवणूकदारांना शेअर ट्रेडिंगमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका महिलेला शिवाजीनगर पोलिसांनी बेळगाव (कर्नाटक) येथून जेरबंद केले आहे. राजश्री राजेश तुडयेकर...

हातचलाखीने ज्वेलर्समधून दागिने लांबवणारी टोळी लोहगाव पोलिसांच्या जाळ्यात; ५ जणांना अटक, अडीच लाखांचा मुद्देमाल...

पुणे: लोहगाव परिसरातील एका ज्वेलर्सच्या दुकानातून हातचलाखीने चांदीचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीला लोहगाव पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने शिताफीने जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी पाच...

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलिसांची सलग दुसरी मोठी कारवाई; २० ग्रॅम...

'नशामुक्त भारत अभियान' आणि 'ड्रग्ज फ्री महाराष्ट्र' या मोहिमेअंतर्गत पुणे ग्रामीण पोलिसांनी शिरूर परिसरात अंमली पदार्थ तस्करांविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष...

error: Content is protected !!