पुणे:
कल्याणीनगर येथील ट्रम्प टॉवरसमोर फोनवर बोलत थांबलेल्या नागरिकाला “रागाने का पाहतोस” असे म्हणून जीवे मारण्याची धमकी देत रोख रक्कम लुटणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना येरवडा तपास पथकाने जेरबंद केले आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचा तपशील
फिर्यादी इसम कल्याणीनगरमधील ट्रम्प टॉवरसमोर मोबाईलवर बोलत उभे असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांना धमकावून त्यांच्या खिशातील १५,१०० रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली होती. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३२५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ३०९(४), ३५१(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.
अशी झाली कारवाई
गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस अंमलदार साईनाथ म्हस्के आणि अनिल मन्हाळकर यांनी घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणाद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित आरोपी हे हडपसर भागातील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार हडपसर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
अटक करण्यात आलेले आरोपी
निखील उर्फ दादया शशिकांत कांबळे (वय २६ वर्षे, रा. वेताळबाबा वसाहत, हडपसर, पुणे): हा जबरी चोरी व चोरीतील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर हडपसर पोलीस ठाणे व पुणे शहर आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण २७ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
अयान नासीर शेख (वय २२ वर्षे, रा. सय्यदनगर, हडपसर, पुणे): याच्यावर एकूण ०४ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
जप्त केलेला मुद्देमाल
आरोपींकडून एक मोटारसायकल, १०,००० रुपये रोख रक्कम आणि आधारकार्ड असा एकूण ६०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक किशोर बेरड करत आहेत.
तपास व कामगिरी करणारे पोलीस पथक
सदरची यशस्वी कामगिरी पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:
मार्गदर्शक अधिकारी:
श्री. मनोज पाटील (अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर)
श्री. चिलुमुला रजनीकांत (पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ४, पुणे शहर)
श्री. सुनिल जैतापुरकर (सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर)
पोलीस ठाणे प्रमुख व पर्यवेक्षक:
श्री. उमेश गित्ते (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस स्टेशन)
श्री. केशव दिडे (पोलीस निरीक्षक – गुन्हे)
तपास पथक व अंमलदार:
पोलीस उप-निरीक्षक किशोर बेरड
पोलीस अंमलदार: मुकुंद कोकणे, शैलेश वाबळे, साईनाथ म्हस्के, अनिल मन्हाळकर, बालाजी सोगे, गणेश पालवे, संदिप जायभाय, नटराज सुतार आणि सोमनाथ गायकवाड.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























